नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीमधील शिवाजीनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री मोठी घरफोडी झाली. यामध्ये सूमारे १९ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी तूर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदविला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
कृष्णा गजाकोश यांच्या घरात ही चोरी झाली असून कृष्णा हे खासगी वाहनचालक आहेत तर त्यांचे वडील हे बेस्टमध्ये टी.सी. या पदावर काम करतात. घरक्रमांक २३७ मध्ये गजाकोश हे कुटूंब एकत्र राहतात. आई, वडील व बहीणीसह कृष्णा हे येथे राहतात. एकाच खोलीत झोपण्याची जागा अपुरी पडत असल्याने गजाकोष यांनी त्याच खोलीवर अजून एक खोली बांधली आहे. गुरुवारी मार्गशिष महिन्याचा शेवटच्या गुरुवारचे उद्यापन आटोपल्यावर गजाकोष कुटूंबातील कृष्णा व त्यांचे वडील वरच्या खोलीत झोपले तर त्यांची आई व बहिण ही घराजवळील नातेवाईकांकडे झोपली होती. पहाटे पावणे सहा वाजता कृष्णा यांना जाग आल्यावर त्यांना खालच्या घरातील कपाट्याचे कुलूप तुटल्याचे पाहिले. कपाट तपासल्यावर चोरट्याने गजाकोष कुटूंबीयांचे सर्वच दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उजेडात आले.