राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य कारभारावरून सडकून टीका केली. एकनाथ शिंदेंना संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं, असं वाटत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. तसेच “अरे शरद पवारांनी बारामतीत एवढी वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही,” असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ते बुधवारी (४ जानेवारी) नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे. आम्ही सांगू तो कायदा आणि तो पोलिसांनी मानला पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रभर राबवला जातो आहे. ठाण्यात तर टिपून टिपून मारतात, तसं टिपून टिपून मारलं जात आहे.”

“अरे शरद पवारांनी बारामतीत एवढे वर्षे राजकारण केलं, त्यांचंही…”

“मुख्यमंत्र्यांना वाटतं संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं. अरे शरद पवारांनी बारामतीत एवढे वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही. असं कधी असतं का?” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

व्हिडीओ पाहा :

“नशीब पोलिसांना मतदान करायला सांगितलं नाही”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “हे मुख्यमंत्री नाहीत, तर ‘व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र’ आहेत. व्हाईसरॉय कसा त्याच्या हातात कायदा असल्याप्रमाणे कोणाचंही ऐकायचा नाही, तसेच एकनाथ शिंदे व्हॉईसरॉय आहेत. नवी मुंबईच्या निवडणुका येतील तेव्हा नशीब पोलिसांना मतदान करायला सांगितलं नाही. आता एवढंच शिल्लक राहिलं आहे. नाहीतर पोलिसांना सांगतील तुम्ही जाऊन बटन दाबून या.”

हेही वाचा : आव्हाडांच्या जीवाला धोका, गृहखात्याचा मोठा निर्णय; विचारलं असता म्हणाले “माझ्या घराची रेकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच होत नाहीत. असं कधी होतं का? तीनचा वार्ड असावा असं आत्ताचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते तेव्हा नक्की झालं. त्यासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाला. आता ते म्हणत आहेत की चारचा वार्ड करा,” असं म्हणत आव्हाडांनी शिंदेंवर टीका केली.