उरण : वाढवण व जेएनपीए बंदरात भविष्यात प्रत्येक्ष व अप्रत्यक्ष एक कोटी रोजगाराची संधी उपलब्ध होतील असा दावा जेएनपीए बंदराचे अध्यक्ष व वाढवण बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष शरद वाघ यांनी केला आहे. बुधवारी जेएनपीटी एकता कामगार संघटनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. जेएनपीए बंदराचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बंदराच्या कामगार वसाहतीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी वाघ यांची संजीवन म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. त्यांनी यावेळी जागतिक बँकेने उत्तमतेच प्रमाणपत्र दिले आहे. सद्या जेएनपीएचा ९३ व्या क्रमांकावरून जागतिक पातळीवर २३ वर झेप घेतला आहे. बंदराने राज्यालाआर्थिक  स्थान मिळवून दिलं आहे. त्यामुळे पुढील शंभर वर्षात जेएनपीए आणि वाढवण मुळे हे स्थान प्रस्थापित होणार आहे.

 २०२० ते २०२५ मध्ये जेएनपीएची आर्थिक सुबत्ता निर्माण झाली. यातून स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करील जेएनपीए हे देशाच आर्थिक हृदय  मुंबईला पर्याय म्हणून जेएनपीए निर्माण झालं आता १ कोटींची कंटेनर हाताळणीची क्षमता पूर्ण झाली आहे. त्यातूनच वाढवण या बंदराचा पर्याय असणारा आहे. ७६ हजार कोटींची गुंतवणूक या बंदरात केली जाणार आहे. वाढवण मुळे विस्थापन होणार नाही. पूर स्थिती निर्माण होणार नाही. वाढवण बंदरग्रस्तांना जेएनपीएतील विकास दाखविण्यात आले. मागण्यांसाठी कामगार आंदोलन बंद झाली असा दावा केला. संघर्ष नव्हे सहकार्याची भूमिका घेतली जात आहे. कामासाठी सहकार्य विकास योजना स्थानिकाचा अधिकार बाधीताना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल. मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जेएनपीए परिसरात त्रंबकेश्वर मंदीर प्रतिकृती

जेएनपीटी मधील रस्ते धुळमुक्त करणार लोकसत्ता एकांकिका प्रयोजक स्वीकारले आहे. कामगार आणि स्थानिकांना लाभ होणार आहे. बंदरातील कामगार २०३० पर्यंत निवृत्त होणार  त्याचप्रमाणे आरोग्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगीकरनातू दहा हजार नवे रोजगार निर्माण होणार वाढवण बंदरात एक कोटी रोजगार निर्माण होतील असा दावा त्यांनी केला आहे.

 जेएनपीए कामगार एकता संघटनेचा कामगार मेळावा कामगार वसाहती मधील बहुद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ,मनीषा जाधव,बोरवणकर संजीवन म्हात्रे,जयप्रकाश सावंत जेएनपीए एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील  आदीजण उपस्थित होते.  यावेळी गायिका कडू खरात गायक राजरत्न यांच्यासह पथकाने स्फूर्ती गीते सादर केली.