उरण : मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता उरणच्या करंजा बंदरात उतरू लागली आहे. त्यामुळे घाऊक व स्वस्त मासळी मिळण्याचे नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मासळी खरेदी करायची असेल तर उरणच्या करंजा बंदरात या असे आवाहन येथील मच्छिमारांनी केले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीतून करंजा येथे एकाचवेळी ७५० मासेमारी बोटी उभ्या करून मासळीची खरेदी विक्री करण्याची व्यवस्था असकेले करंजा बंदर सुरू झाले आहे. नव्या हंगामामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी दररोज येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. यामध्ये मासेमाराना विविध प्रकारचे मासे मिळत असून वाढीव भाव ही मिळत आहे.त्यामुळे या बंदरातील मासेमारी करणारा व्यवसायिक सध्या सुखावला आहे.

हेही वाचा… उरण एज्युकेशन विद्यालय संस्थेच्या ओळखपत्र शुल्काला भाजपचाही विरोध

केंद्रिय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी करंजा बंदराला भेट देऊन या परिसरातील मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना विविध शासकीय योजनांची माहिती करून देत सदर योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा… जेएनपीए बंदरात सडतोय कांदा; २०० कंटेनर मधील ४ हजार टन सडू लागला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मत्स्य विभाग तथा परवाना अधिकारी यांच्या देखरेखीखाली मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांनी अनेक मच्छीमार सोसायटीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यातच सध्या करंजा बंदरातून समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या नौका मधिल व्यवसायिकांच्या जाळ्यात समुद्रातील मोठी कोळंबी,छोटी कोळंबी ,पापलेट, सुरमई,हलवा,माकुळ,रावस,बांगडा,बला,मुशी, बोंबील व जिताडा सारखी इतर जातीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असून त्यांना योग्य दर मिळत आहे. मुंबईतील ससून डॉक मध्ये मासळीचा व्यवहार करणे जिकरीचे झाले होते. वाढत्या गर्दीमुळे मासेमाराना आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागत होता. मात्र करंजा बंदरातील मसेमारीमुळे आम्हाला फायदा होत असल्याचे मत स्थानिक मच्छिमार विनायक पाटील यांनी व्यक्त केले आहे.