जगदीश तांडेल उरण :
सत्तावीस वर्षे प्रतिक्षेत असलेला बहूचर्चित खारकोपर ते उरण हा लोकलचा रेल्वे मार्ग मार्च अखेर पर्यंत सुरू होणार आहे. त्यासाठी शनिवारी( ४ )व सोमवार ( ६) मार्चला रेल्वे सुरक्षा आयुक्त  या मार्गाची पाहणी करणार आहेत. या मार्गावरील उरण,द्रोणागिरी(बोकडविरा),न्हावा- शेवा(नवघर),रांजणपाडा व गव्हाण(जासई) ही मार्गावरील स्थानके पूर्णत्वास जात आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीत हापुस निर्यातीला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील प्लॅटफॉर्म, वाहनतळ,तिकीट घर आदींची कामेही रात्रंदिवस सुरू आहेत. त्याचप्रमाणे उरण स्थानकातील पॉवर हाऊस व यार्डाची ही काम वेगाने सुरू आहे.  उरण ते खारकोपर प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहीती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली. तर उरण ते खारकोपर हा मार्ग सुरू झाल्या नंतर हा कॉरिडॉर पूर्ण होईल आणि उरणला सीएसएमटीशी जोडले जाईल. त्यामुळे उरण ते सीएसएमटी असा प्रवास येथील प्रवाशांना करता येणार आहे.