नवी मुंबईतील अनेक गुंतवणूक दारांनी १४ महिन्यात दुप्पट पैशाच्या मोहापायी सानपाडा येथील दैविक उदय ट्रेड सेंटर या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट मदतीची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अपुऱ्या मनुष्यबळाने रेल्वे सुरक्षेवर ताण! २६ लाख प्रवाशांसाठी केवळ ८१ रेल्वे पोलीस तैनात

शेअर बाजारात आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून महिन्याला साडेसात टक्के नफा आणि साडेसात टक्के व्याज असे एकूण १५ टक्के दर महिन्याला देण्याचे आश्वासन देत शेकडो गुंतवणूकदारांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट घेत मदतीची मागणी केली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज नवी मुंबई पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची भेट घेऊन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध तसेच कंपनी विरुद्ध त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलेय.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somayya seeks help from investors defrauded by a company promising to pay 15 percent per month in navi mumbai dpj
First published on: 07-12-2022 at 19:07 IST