scorecardresearch

नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालयात खांदे पालट

नवी मुंबईतील कोपरखैरणे नोडमध्ये सहाय्यक आयुक्त अर्थात विभाग अधिकारी सागर अर्जुन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या जागेवरील प्रशांत गावडे यांची नियुक्ती कर विभागात करण्यात आली आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालयात खांदे पालट
कोपरखैरणे विभाग कार्यालयात खांदे पालट (image – लोकसत्ता टीम)

नवी मुंबईतील कोपरखैरणे नोडमध्ये सहाय्यक आयुक्त अर्थात विभाग अधिकारी सागर अर्जुन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या जागेवरील प्रशांत गावडे यांची नियुक्ती कर विभागात करण्यात आली आहे. सागर मोरे हे याअगोदर मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम पाहत होते.

नवी मुंबईतील कोपरखैरणे नोडमध्ये महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पद सांभाळणे हे इतर नोडच्या तुलनेत आव्हानात्मक समजले जाते. लोकसंख्येची घनता इतर नोडच्या तुलनेत प्रचंड असल्याने सुविधांवर पडणारा ताण, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम, सर्वाधिक अनधिकृत फेरीवाले, जवळपास सर्वच ठिकाणी मार्जिनल स्पेसचा होणारा व्यावसायिक वापर, स्वच्छ शहर असूनही या नोडमधील अस्वच्छता या सर्व समस्या इतर नोडच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर आहेत. या शिवाय गल्लोगल्ली झालेल्या नेत्यांना तोड देता देता नियमात राहून काम करणे हे मोठे आव्हान या ठिकाणी पेलावे लागते, अशी पूर्ण मनपात कायम चर्चा असते.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या दिल्लीतील चित्ररथात ‘साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर’

हेही वाचा – रायगड : विमला तलावात आढळले मृत मासे

प्रशांत गावडे यांनी यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवले होते. या शिवाय कार्यालयातील वातावरण अतिशय सौंहार्दपूर्ण आणि हलके फुलके ठेवल्याने कर्मचाऱ्यांचे एकमेकांना साहाय्य करत कामकाजाचा निपटारा चांगला होत होता. मात्र, त्यांच्याच कार्यकाळात विभाग कार्यालयात संगणकाच्या भागांची चोरीने नाराजी होती. अर्थात त्या चोराला वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गावडे यांनी केलेल्या कामात सातत्य ठेवणे हे नवीन रुजू झालेले सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या समोरील आव्हान आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 15:54 IST

संबंधित बातम्या