नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका अट्टल आरोपीस जेरबंद केले असून त्याच्याकडे १७ तोळे वजनाचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी हा लहान वयापासूनच घरफोडी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. 

रिजवान उस्मान खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बोनकोडे येथे राहणारे वसीम पटेल हे दोन तारखेला सकाळी सव्वाआठ ते साडेनऊ दरम्यान कामानिमित्त घराबाहेर होते. याच दरम्यान त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत घरातील २ लाख ७० लाख रुपयांचे दागिने चोरी केले होते. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी तात्काळ कारवाई करीत एक पथक नेमले. पोलीस निरीक्षक  सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक  सागर टकले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कन्नेवाड, पोलीस हवालदार  योगेश डोंगरे, संतोष चिकणे, विनोद कांबळे, राकेश पाटील, दिपाली पवार, पोलीस शिपाई औदुंबर जाधव, राहुल डोंबाळे, किरण बुधंवत, शंकर भांगरे या पथकाने तपास करीत असताना सदर गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात चित्रणात आरोपी आढळून आला होता. याबाबत खबऱ्यांनाही सतर्क करण्यात आले होते. या प्रयत्नांना यश आले व आरोपी मुंब्रा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंब्रा येथे तपास करत त्याचा ठावठिकाणा शोधून काढला व सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा – गणपत गायकवाडांच्या नाराजीमुळे खासदार श्रीकांत शिंदे सावध, कल्याण पूर्वमध्ये विकासकामांचा धडाका

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटक आरोपीकडून ५ गुन्ह्यातील १७ तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.