लोकसत्ता टीम

उरण : अपायकारक, अतिवाईट आशा प्रकारच्या हवेच्या गुणवत्तेत उरणची हवा देशात अव्वल कायम आहे. गुरुवारी उरण मधील हवा दुपारी दिड ते २ वाजता ३०० च्या प्रदूषण निर्देशांकावर पोहचली होती. ही मात्र देशात पुन्हा एका पहिल्या स्थानावर नोंदली गेली होती. तर साडेतीन वाजता हा निर्देशांक १५० वर खाली आला होता. त्यामुळे उरणमधील हवेतील प्रदूषणाच्या मात्रेत चढउतार सुरू आहे.

आणखी वाचा-इमारत बांधकामाच्या ठिकाणी अचानक कोसळली क्रेन; एक गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोडीला उरण परिसरातील अनेक ग्रामपंचायती कडून रस्त्याच्या व मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आलेल्या कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. या काचाऱ्यांच्या डोंगरा एवढ्या ढिगाना आगी लावण्यात येत असल्याने या आगीमुळे निर्माण होणाऱ्या घातक धुरामुळे वातावरणातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन प्रदूषणातही अधिकची भर पडत आहे. उरणच्या प्रदूषणाच्या या वाढत्या समस्येकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे.