|| संतोष जाधव
फेब्रुवारीपासून नोंदणी करणारे महापालिका निवडणुकीत मताधिकारापासून वंचित
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने केवळ ३१ जानेवारीपर्यंतच नोंदणी झालेल्या मतदारांची नावे ग्रा धरली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर नावाची नोंदणी करणाऱ्या हजारो नव आणि स्थलांतरीत मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई पालिकाक्षेत्रात बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा क्षेत्रांचा भाग आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदारयादी आणि नव्याने ३१ जानेवारीपर्यंत तयार करण्यात आलेली मतदार यादी ग्रा धरली जाणार आहे. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर होणाऱ्या नोंदणीची दखल आयोगाला यादीत घेता येमार नाही. नवी मुंबई महापालिकेत बेलापूर मतदारसंघात सुमारे तीन लाख ८५ हजार, तर ऐरोली मतदारसंघात चार लाख ७४ मतदार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मतदारयाद्यांची प्रभागनिहाय विभागणीचे काम करावे लागते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून ३१ जानेवारीपर्यंत अस्तित्वातील मतदारयादीच ग्रा धरली जाणार आहे. त्यामुळे सध्या शहरभर सुरू असलेली मतदारनोंदणी ही पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य़ धरली जाणार नाही. त्यामुळे नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांची नावे पालिका निवडणुकीच्या यादीत येणार नसतील,असेच चित्र आहे.
निवडणूक आयोगाच्या ३१ जानेवारी २०२०च्या पत्रानुसार निश्चित झालेले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी हे पत्र दिले आहे. तर भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार विशेष मतदार नावनोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. त्याची अंतिम यादी ही ५ मे २०२० रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतू या ३१ जानेवारी २०२० नंतर करण्यात आलेल्या मतदारनोंदणीचा उपयोग पालिका निवडणुकीसाठी होणार नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीपासून शहरातील हजारो नवमतदार आणि स्थलांतरीत मतदार वंचित राहणार आहेत.
निवडणूक आयोगाकडून मतदारनोंदणीसाठी दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जाचा निर्णय घेतला जात आहे. पालिकेसाठी कोणती मतदार यादी वापरण्यात येणार याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग निर्णय घेते, अशी माहिती बेलापूर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. याबाबत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र सचिव किरण कुरुंदकर यांना संपर्क केला असता तो झाला नाही.
२८ फेब्रुवारीला पुनर्रक्षित यादी
२८ फेब्रुवारीला संक्षिप्त पुनर्रक्षित यादी प्रसिद्ध होणार असली तरी राज्य निवडणूक आयोगाने याबाबत ३१ जानेवारीपर्यंतची यादीच पालिकेसाठी निश्चित केली जाणार असल्याने हजारो नवमतदार पालिका निवडणुकीपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत.
३१ जानेवारीनंतर नोंद झालेल्यांची नावे पालिकेच्या मतदारयादीत न आल्यामुळे हजारो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीपर्यंतची नावे पालिका निवडणुकीसाठी घेण्यात यावी याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. -विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख बेलापूर विधानसभा क्षेत्र