महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून (दि. ४,५ आणि ६ जानेवारी) ७२ तासांच्या संपावर जात आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर वाशी परिमंडलातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेआहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: बसथांबा की पार्किंगथांबा ; सीवूड्स पश्चिमेचा बसथांबा बनलाय पार्किंग थांबा, परिसरालाही बकाल रुप

कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात नसणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई वाशी मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक संप कालावधीत चोवीस तास सुरू राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संप काळात वीजेसंदर्भातील तक्रारी व माहिती देण्यासाठी वाशी कार्यक्षेत्रातील  ८८७९९३५५०१,  ९९३००२५१०४ या क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. राजाराम माने,  मुख्य कार्यकारी अभियंता,वाशी मंडळ विभाग