नवी मुंबई: भावाचा गळ्यावर धारधार चालून वार करून त्याची हत्या केल्या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लगत असणाऱ्या एमआयडीसीतील निर्जन ठिकाणी हि घटना घडली असून संशयावरून मयत व्यक्तीच्या भावाने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्यांची कबुली दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

सुरेश होनहागा असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून संजय बेहरा असे मयत व्यक्तीचे नाव आहे.  दोघे नात्याने मावस भाऊ असून सोमवारी पावसालाही सहली साठी म्हणून नवी मुंबई लगत असणाऱ्या एमआयडीसीतील  बावखलेश्वर मंदिराच्या मागील धबधब्यावर ते गेले होते. त्या ठिकाणी दोघांचे काही गोष्टींवरून वाद झाले. त्यात सुरेश याने सोबत आणलेल्या चाकूने संजय याच्या गळयावर सपासप दोन तीन वार केले.

वार केल्याने तो खाली कोसळला. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. संजय घरी न आल्याने त्याची शोधाशोध सुरु केली गेली. संजय आणि सुरेश दोघे सोबत गेल्याने सुरेश कडे चौकशी केली गेली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी  मंगळवारी सुरेश याने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तात्काळ पथक पाठवून माहितीची शहानिशा केली असता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धबधब्याजवळ मृतदेह आढळून आला. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे गाडीही जाण्याची सोय नसल्याने पोलिसांनी सुमारे दोन किलोमीटर मृतदेह घेऊन रस्त्यावर आले आणि तेथून रुग्णवाहिकेतून वाशीतील मनपा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी देण्यात आला.   याबाबत मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला. हि हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज व्यक्त होत असून संशयितांची चौकशी केल्यावर हत्येचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.