नवी मुंबई : आज सकाळी साडेपाचच्या सुमारास जरांगे पाटील हे नवी मुंबईत पोहोचले. आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची सभा होणार असून त्यानंतर मुंबईकडे निघणार आहेत. सध्या अन्य वक्त्यांची भाषणे सुरू असून हजारो लोकांचा जनसमुदाय वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात जमला आहे. 

हेही वाचा – पनवेलच्या ‘क्रेझी बॉईस’ लेडीजबारचा परवाना रद्दच

हेही वाचा – Maratha Aarakshan Morcha : मराठा मोर्चेकरी हळूहळू नवी मुंबईत दाखल, ५०० पेक्षा अधिक लोकांनी केले जेवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरक्षण घेऊनच मुंबईतून जाणार हा निर्धार करीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघाला आहे. २० जानेवारीला जालना येथून मोर्चा निघाला आणि मजल दरमजल करीत गावोगावी जागृती करीत मोर्चा आज पहाटे पाचच्या सुमारास नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचला. तत्पूर्वी अनेक मोर्चेकरांनी थेट नवी मुंबई गाठले होते. आता वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात प्रचंड मराठा बांधव जमले आहेत. प्रतीक्षा आहे ती जरांगे पाटील यांच्या आगमनाची.