scorecardresearch

Premium

७ लाखांचा एमडी अंमली पदार्थ एपीएमसी पोलिसांकडून जप्त, दोघांना अटक 

एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून एमडी अर्थात मेथाक्वालोन अंमली पदार्थ हा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली आहे.

MD drugs worth 7 lakhs seized by APMC police
दिलीप राठोड आणि ताहीर अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

वी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून एमडी अर्थात मेथाक्वालोन अंमली पदार्थ हा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या कडून ७ लाख ८३ हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. 

दिलीप राठोड आणि ताहीर अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एपीएमसी परिसरातील सेक्टर २९ वाशी एकता नगर झोपडपट्टी पुनीत कॉर्नर येथे दोन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीस आणणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंग झडती घेतली असता दिलीप याच्याकडे ३ लाख ७३ हजार ८०० रुपये किंमतीची उग्र वास येणारी तपकिरी रंगाची पावडर जप्त करण्यात आली. त्याचे वजन  ३४.१५ ग्रॅम, अंमली पदार्थाचे निव्वळ वजन ३१.१५ ग्रॅम होते. याची किंमत प्रति ग्रॅम १२ हजार रुपये प्रमाणे आहे.

police leave encashment
रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप
School Boy Kidnapped, pune, 50 Lakhs Ransom, Safely Rescued, police, Kidnappers, search,
पुणे : शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू
illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी
mumbai drug license marathi news, mumbai drug shops marathi news
औषध परवान्यांच्या निलंबनाऐवजी दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव, निलंबन रद्द करण्याचे अधिकार फक्त मंत्र्यांना!

आणखी वाचा-नवी मुंबईत परदेशी नोकरीच्या बहाण्याने ११२ जणांची ८१ लाखांची फसवणूक

याशिवाय ४ लाख ९ हजार २०० रुपयांची ३७.१० ग्रॅम, अशीच पावडर ताहीर मोहमंद अलीकडे आढळून आली. त्याची तपासणी केली असता मेथाक्वालोन अंमली पदार्थ असल्याची खात्री पाटल्यावर दोघांना अटक करण्यात आली. अशा प्रकारे दोघांकडे मिळून एकूण ७ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मेथाक्वालोन अंमली पदार्थ आढळून आला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Md drugs worth 7 lakhs seized by apmc police two arrested mrj

First published on: 29-11-2023 at 15:54 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×