नवी मुंबई: नवी मुंबईतील नियोजित वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास दिलेल्या भूखंडाचे पैसे मनपाने सिडकोला लवकरात लवकर द्यावे म्हणून आमदार मंदा म्हात्रे या २५ तारखेला (शुक्रवारी) मोर्चा काढणार होत्या. मात्र हा मोर्चा रद्द केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालय होणार यावर त्या ठाम असून भूखंड कुठला द्यावा हा निर्णय सिडको, मनपा आणि राज्य ठरवतील असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> निसर्ग उद्यानात ९५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे चित्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई भाजपा शिष्टमंडळासह नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट गुरवारी घेतली. यावेळी नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबत बाबत चर्चा केल्या नंतर त्यांनी जनआंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. महापालिकेवर जे जनआंदोलन उभारण्यात आले होते ते सद्यस्थितीत रद्द करण्यात आलेला असून राज्य शासन व महानगरपालिका नियमानुसार अपेक्षित निर्णय घेतील. त्यामुळे शासना विरुद्ध घेण्यात आलेल्या आंदोलनातून आम्ही सद्स्थितीत माघार घेत आहोत असेही आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. आयुक्तांशी भेट झाल्या नंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हि माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉ.राजेश पाटील, माजी नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.