Panvel Crime News : बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेनंतर बालिकांवरील अनेक अत्याचाराच्या घटनेला वाचा फुटत आहे. पनवेलमध्ये दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका प्रकरणाला वाचा फुटली असून पोलीस अत्याचारी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. 

२१ ते २२ जून या दरम्यान ही घटना पळस्पे फाटा येथील खासगी संकुलाच्या एका वाहनतळात ही घटना घडली. विशेष म्हणजे खासगी विकासकाने बांधलेल्या या महागृहनिर्माणाची सूरक्षा व्यवस्था चोख असल्याचा दावा केला जात होता. पळस्पे फाटा येथील पारपुंड गावात राहणारा २५ वर्षीय रिक्षाचालकाने त्याच्या ओळखीच्या १३ वर्षाच्या बालिकेला २१ जूनच्या रात्री आठ वाजता आजिवली गावाजवळून रिक्षात जबरदस्तीने बसवून पळस्पे फाटा येथील महागृहनिर्माणामधील एका इमारतीच्या वाहनतळात घेऊन जाऊन तेथेच तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलीसांना पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live : रोहित पवारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का, मधुकर राळेभात यांचा राजीनामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हा दाखल

पिडीत बालिकेला दूस-या दिवसापर्यंत नराधम रिक्षाचालकाने स्वताच्या ताब्यात ठेवल्यावर दूस-या दिवशी सकाळी तिला सात वाजता तिच्या घरी सोडले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी या गंभीर प्रकरणात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदवून तपास सूरु केला आहे.