नेरुळ एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस नेरुळ सेक्टर ६० येथील डी व ई येथे मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शन यांना पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी देण्यात आली नाही .त्यामुळे विनापरवाना सुरु असलेल्या कामाबाबत खुलासा सादर करावा अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे प्रकरण ५२ व ५३ अन्वये कारवाई करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे पालिकेने केला होता. याबाबत मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शनकडून पालिकेला खुलासा पाठवला असल्याची माहिती महापालिकेच्या नगररचना विभागाने दिली आहे. परंतु या खुलाशात काय लपले आहे? याची उत्सुकता पर्यावरणप्रेमींना लागली आहे.

हेही वाचा- नेरुळ एनआरआयमागील मिस्त्री कंन्स्ट्रक्शनचे बेकायदा बांधकाम तात्काळ थांबवा ; पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरीकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

एनआरआय कॉम्प्लेक्स पाठीमागील बाजूला पालिकेच्या बांधकाम परवानगीविना सुरु असलेले काम तात्काळ थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरीकांनी पालिका,सिडको व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.सीवूड्स एनआरआय कॉम्प्लेक्स येथील कामावरुन पर्यावरणप्रेमींनी वारंवार पालिका, सिडको, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. पाणथळ जमिनीवर बहुमजली ९ निवासी संकुले व गोल्फ मैदान बनविण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसरीकडे न्यायालयाच्या सूचनांना व पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या ठिकाणी बेकायदा बांधकाम सुरु असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी यांनी केला आहे.

हेही वाचा- उद्योगमंत्र्यांकडून उद्योजकांना दिवाळी भेट

सीवूड्स एनआरआय परिसरात सिडकोच्या परवानगीने मिस्त्री कंन्सट्रक्शन यांनी ७२४ झाडे तोडल्याप्रकरणी तसेच येथील गोल्फ कोर्स व गृहसंकुल निर्मिती प्रकरणाबाबत सुरवातीपासूनच पाठपुरावा करणारे या विभागातील पर्यावरणप्रेमी व नागरीक यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. सीवूडस सेक्टर ६० एनआरआय़ कॉम्प्लेक्स ऐ,बी,सी डी व ई ब्लॉकमधील ३३.५५ हेक्टर जागेवर गोल्फ कोर्स व बहुमजली निवासी उभारण्याची परवानगी सिडकोने दिली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही ऑक्टोबर २०१७मध्ये ही जागा पाणथळ यादीत असल्याने येथील काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा- चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील या जागेवर बांधकाम परवानगी सिडकोने दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पालिकेच्या अधिकारावर हा गदा आणण्याचा प्रकार असून पालिकेनेही याबाबत संबंधित मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शनला खुलासा करण्याचे पत्र दिले होते.त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री यांनी तातकाळ लक्ष घालून नेरुळ एनआरआय जवळील बेकायदा काम तात्काळ थांबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागानेही संबंधित कंपनीला तात्काळ खुलासा करण्याचे पत्र दिले होते त्याप्रमाणे पालिकेला खुलासा प्राप्त झाला असून या खुलाशामध्ये संबंधित विकसकाकडून काय बाजू मांडण्यात आली आहे याची उत्सुकता लागली आहे.

एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डी व ई पॉकेटमध्ये पालिकेची कोणतीही परवानगी न घेता काम सुरु आहे. पलिकेने विकसकाला बेकायदा बांधकाम करत असल्याबाबत ३० ऑगस्ट रोजी खुलासा मागितला होता. तो खुलासा प्राप्त झाला असेल तर तात्काळ सर्वांसमोर आणावा, असे मत पर्यावरणप्रेमी सुनील अग्रवाल यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- राज्यात केंद्राच्या योजनांचा बोजवारा; कामाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

खुलाशामध्ये लपलंय काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेरुळ एनआरआय जवळील जागेवर पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता काम सुरू करण्यात आले होते त्याबाबत संबंधित खुलासा मागवला होता तो पालिकेला प्राप्त झाला असून याची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेतील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी दिली.