नवी मुंबईमधील खारघर येथे ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री शिव इलेक्ट्रॉनिक्स हे मोबाईलचे शोरूम गॅस कटरद्वारे कट कापून दुकानातील महागडे मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला मात्र सध्या मुंबईतील माटुंबा येथे राहणाऱ्या शफिकउल्ला उर्फ सोनु अतिकउल्ला(२४), मुळचा बिहारचा असलेला व सध्या धारावीत राहत असलेला अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (२८), नालासोपारा येथील इम्रान मोहमद उर्फ इम्मु बिंदु अन्सारी (२५) यांचा समावेश आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून ११ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे.

आरोपींकडून सुमारे ४५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल, लॅपटॉप, डीव्हीआर इत्यादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. शिवाय, या गुन्ह्यात वापरलेली टॅक्सी देखील आरोपींनी १४ ऑगस्ट रोजी कुर्ला येथून चोरी केलेली होती. याबाबत कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने हा गुन्हा देखील उघडकीस आला आहे.

हे आरोपी सराईत गुन्हेगार असून गुन्हा करण्याअगोदर गाडी चोरी करून ते मोबाईल शोरूमची रेकी करतात. त्यानंतर ताडपत्रीच्या आडोशाने गॅस कटरने शोरुमचे शटर कट करून चोरी करतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवी मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त प्रवीणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणण्यात व तपाससाठी मार्गदर्शन केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile showroom robbery gang in kharghar arrested msr
First published on: 08-09-2020 at 17:18 IST