नवी मुंबई : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ५ किमी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. हि स्पर्धा पामाबीच मार्गांवर घेण्यात येणार असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालंयाच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर देशात जुनागड, निजाम, काश्मीर असे असेन ठिकाणचे संस्थानीकांनी भारतात सामील होण्यास नकार दिला होता. त्या सर्वांना भारतात सामील करून घेण्यासाठी देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या धाडसी पण संयमीत कारवाईने भारत एकसंघ झाला.

यंदा त्यांच्या जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण झाले असून त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून देशात ठिकठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबईताही विविध ठिकाणी कर्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हि सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त ५ किमी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पामबिच मार्गावरील बेलापुर कडुन वाशी-मुंबई- ठाणे कडे जाणा-या वाहीनीवर बेलापूर किल्ले गावठाण ते मोराज सर्कल सानपडा पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

या मार्गांवरून जी वाहनांची वाहतुक ही पामबिच मार्गावरील वाशीकडुन बेलापुर जाणा-या वाहीनी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पामबिच मार्गावर मोराज सर्कल पासुन बेलापुरकडे जाणा-या वाहीनीवर दोन्ही बाजुकडील वाहतुक वळविण्यात येणार आहे.स्पर्धे निमित्त रविवारी (ता. २) पहाटे २ ते सकाळी १० वाजे पर्यंत हि स्पर्धा होणार आहे.

पर्यायी मार्ग

वाशी कडुन किल्ला जंक्शनकडे जाणारी वाहने आणि किल्ला जंक्शनकडुन वाशीकडे जाणारी वाहने ही उर्वरित जाणा-या मार्गाने एकाच दिशेच्या मार्गीके वरून पामबिच मार्गावर मोराज सर्कल पासुन बेलापुरकडे जाणा-या वाहीनीवर दोन्ही बाजुकडील वाहतुक वळविण्यात येत आहे याच मार्गाने पामबीच मार्गावरुन इच्छीत स्थळी जातील तसेच येतील.या शिवाय शीव -पनवेल महामार्ग वरील उरणफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील तसेच येतील.या प्रवेश बंदीतून पोलीस वाहने, अग्निशमन वाहने रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वेगळण्यात आले आहे.