नवी मुंबई: नवी मुंबई अतिक्रमण विरोधी विभागाने आज तुर्भे आणि नेरुळ मध्ये मोठी कारवाई केली आहे.  नेरुळ मधील दोन इमारतींचे पाणी आणि गॅस पुरवठा बंद केला तर तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या सानपाडा गावातील तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी ही कारवाई झाल्याने दोन्ही कडे मनपाचे अनेक अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

सुनियोजित शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून त्यावर आता ठोस कुठे कारवाई होण्याची आशा निर्माण होत आहे. नेरुळ सेक्टर १६ ए  मध्ये त्रिमूर्ती पार्क आणि कृष्ण कॉम्प्लेक्स या दोन्ही इमारती अनधिकृत आहेत. या ठिकाणी सुमारे ६० कुटुंब राहतात.  या इमारतींचा विद्युत , पाणी गॅस पुरवठा आणि मलनिस्सारण सेवा बंद करण्यात आली आहे. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे न्यायालयाने हा आदेश नोव्हेंबर २०२२ मध्ये दिला होता. कारवाई मात्र आता झाली आहे.

हेही वाचा… मोबाईलचे सुटे भाग विकणारा निघाला ड्रॅग डीलर; तब्बल १ कोटी १ लाख १० हजार रुपयांचे किलोभर एम डी जप्त

याच बरोबर सानपाडा गावातील तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही इमारती गावठाण भागात होत्या. यात तळमजला अधिक पाच मजले, तळमजला अधिक चार मजले, आणि तळमजला अधिक दोन मजले अशी इमारतींची रचना होती. तिन्ही इमारती या निर्माणनधीन अवस्थेत होत्या. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. राहुल गेठे (अतिक्रमण विभाग उपायुक्त): नेरुळ येथे दोन इमारतींवर झालेली कारवाई न्यायालयाच्या आदेशाने झालेली आहे. या शिवाय सानपाडा गावातील तीन इमारतीं जमीनदोस्त करण्यात आला आहे.