विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड घडून आले. या बंडामध्ये एकूण ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात सत्तांतर झाले. आमदार फुटल्यानंतर आता शिवसेनेचे काही खासदारदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. ही गळती सुरु असतानाच आता ठाण्यानंतर नवी मुंबईतील (Navi Mumbai) जवळपास ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> औरंगाबादच्या नामांतरावर काँग्रेस हायकमांड नाराज? राज्यातील मोठा नेता म्हणतो ‘विश्वासात घ्यायला हवे होते’

नवी मुंबई महानगरपालिकेतील ३० ते ३२ नगरसेवक एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक आगामी काळात शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. नवी मुंबईत शिवसेनेचे एकूण ५० नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईमध्येही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील

याआधी ठाणे महानगरपालिकेतही उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे. ठाण्यात शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक आहेत. त्यातील ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.

हेही वाचा >>> ‘रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून उत्तर; विनायक राऊत म्हणाले “त्यांच्या विद्वत्तेबद्दल…”

शिवसेनेचे खासदरही शिंदे गटात सामील होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेतील काही खासदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. एकूण १८ पैकी १२ ते १३ खासदार शिंदे गटात सामील होतील असे भाकित वर्तविले जात आहे. तसा दावा भाजपा तसेच शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे सध्या शिवसेनेला आमदार तसेच नगरसेवकांच्या बंडाच्या रुपात धक्के बसत आहेत. आगमी काळात खासदारांनीदेखील शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्यास, उद्धव ठाकरे नेमकं काय करणार? हे पाहणे उत्सुतकतेचे ठरणार आहे.