नवी मुंबई-नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज आहे.  मुख्यमंत्र्याच्या हस्ते नव्या रुपात असलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन केल्यानंतर बुधवारपासून वंडर्स पार्कच्या प्रवेशासाठीचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सुरवातीला काही दिवस तिकीटपद्धतीने हे नवे दर आकारले जाणार असून ८ दिवसानंतर नागरीकांना उद्यानातील प्रवेश व तिकीटासाठी बॅंकेशी करारनामा करुन स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई: वाशी गावातील २६३ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

करोनाकाळापासून जवळजवळ ३ वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद आहे. त्यामुळे  हे पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता शाळांना सुट्टी लागलेल्या बच्चेकंपनीसह पालकांना होती.नेरुळ येथील वंडर्स पार्कचे मेकओव्हर करण्यात आले असून वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव खेळण्यासाठी असलेली प्रशस्त जागा यामुळे येथे नेहमीच पार्क सुरु झाल्यापासूनच गर्दी पाहायला मिळत होती. आता त्यात  नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित,ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा नविन बसविणे,तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिवे लावणे.  उद्यानात आकर्षक कारंजे  अशी जवळजवळ २३ कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे पूर्णतः मेकओव्हर  करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानाचे प्रवेशमूल्य वाढवण्यात आले आहे.या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे,खारघर,उरण,पनवेल येथुन टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरीक येतात.परंतू आता पार्कमधील खेळण्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. तसेच अधिक देखणे रुप दिलेल्या पार्कचा प्रवेशही महागला आहे.

पालिकेने लागू केलेले  वंडर्स पार्कच्या प्रवेशासाठीचे नवीन दर …….

 वयोगट                              नवे दर

  ५ ते १२ वर्ष वयोगट-                              ४० रुपये                   

  १२ वर्षावरील सर्वांना –                            ५० रुपये                        

प्रत्येक राईड्स शुल्क –                           २५                          

टॉय ट्रेन शुल्क-                      २५                           

जॉगिंगकरता मासिक पास-                       ५०                            

दुचाकी वाहन पार्किंग –                     १०                            

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारचाकी वाहन पार्किंग –                 ५०                            

शाळा वाहन पार्किंग –               ५००                          

स्मार्ट कार्ड सुरक्षा ठेव –              १००