नवी मुंबई : नवी मुंबईत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले तर तीन जणांचा शोध सुरु आहे. या कारवाईत तब्बल ९ महिलांची सुटका करण्यात यश आले आहे. हि कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे.

लॉज व्यवस्थापक मोहम्मद मुनातुल्ला अमिहुसेन शेख उर्फ बबलु, मोहम्मद वकील मकसूद शेख,लॉज मधील कामगार नजरूल आलमउददीन इस्लाम शेख,जहागिर अवरअली मोल्ला, आणि रिक्षा चालक विकास भुवनेश्वर भुनिया, सिताराम रामदास यादव, असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत, तर अब्दुल तरफदार व राजु बंगाली सुधाकर आण्णाया पालन, अब्दुल तरफदार, राजु बंगाली,असे फरार आरोपींची नावे आहेत.

नवी मुंबईतील एपीएमसी भागात असणाऱ्या द्वारका नावाच्या लॉज वर वेश्याव्यसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यातही त्यांनी बनवट ग्राहक या लॉज वर पाठवले. यावेळी लॉजचे दोन्ही व्यवस्थापक मोहम्मद मुनातुल्ला अमिहुसेन शेख उर्फ बबलु, मोहम्मद वकील मकसूद शेख, जहागिर अवरअली मोल्ला, यांनी या बनावट ग्राहकाला वेश्यागमन करण्यास मुलींचे फोटो दाखवले. काही तासांच्या साठी ४ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तर लॉज मधील कामगार नजरूल आलमउददीन इस्लाम शेख याने वेश्यागमन काही साहित्य आणून दिले. मुलगी पसंत केल्यावर रिक्षा चालक विकास भुवनेश्वर भुनिया, आणि सिताराम रामदास यादव यांच्या पैकी एकाने बोनकोडे येथे राहणाऱ्या एका मुलीस घेऊन आला. हि बातमी बनावट ग्राहकाने पोलिसांना देताच या ठिकाणी धाड टाकण्यात आली. आणि सर्वांना ताब्यात घेतले.

चौकशी केली असता यात अब्दुल तरफदार व राजु बंगाली सुधाकर आण्णाया पालन, अब्दुल तरफदार, राजु बंगाली, यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा शोध सुरु आहे.

गुन्हे पद्धत

ग्राहक लॉज मध्ये आल्यावर तीन पैकी जो उपस्थित असेल तो व्यवस्थापक वेश्यागमन साठी मुलींचे फोटो दाखवून पसंती आली तर चार हजार रुपये स्वीकारत होता. त्या नंतर अब्दुल, राजू, सुधाकर आणि राजु बंगाली यांना कळवले जात होते. तर त्यांच्या सांगण्यानुसार विकास किंवा सीताराम हे रिक्षा चालक कोपरखैराणे सेक्टर १२ येथून पसंत पडलेल्या मुलीस लॉज मध्ये घेऊन जात होते. मुलींना राहण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर १२ येथे एक सदनिका भाडे तत्वावर घेण्यात आली होती. पोलिसांनी लॉज आणि या सदनिकेवर धाड टाकून ९ मुलींची सुटका केली आहे.