नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांना ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, नेरुळ, रबाले, ऐरोली रेल्वे स्थानकांसह सीबीडी येथील कोकण भवन, नवी मुंबई महानगरपालिका उडवून देण्याची धमकी निनावी पत्राद्वारे आली आहे. या पत्रामध्ये एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून पोस्टाने आलेल्या या पत्रानंतर पोलीस अधिक तपास करीत आहे. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने नवी मुंबईतील रेल्वे स्थानक, महानगरपालिका, कोकण भवन यांची तपासणी केली, यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र खबरदारी म्हणून नवी मुंबईच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासन, सिडकोला याबाबत सूचना देण्यात आली आहे. या पत्रांची तपासणी नवी मुंबई क्राइम ब्रँचकडे देण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2015 रोजी प्रकाशित
नवी मुंबईच्या महापौरांना धमकीचे पत्र
नवी मुंबई महानगरपालिका उडवून देण्याची धमकी निनावी पत्राद्वारे आली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 25-10-2015 at 00:48 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai mayor get threat letter