scorecardresearch

नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, महापालिका सतर्क

देशात करोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे.मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात सलग ३ दिवस करोनाचा प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.त्यामुळे नागरीकांनीही न घाबरता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. […]

नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, महापालिका सतर्क
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

देशात करोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे.मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात सलग ३ दिवस करोनाचा प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.त्यामुळे नागरीकांनीही न घाबरता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> COVID विषयी Whatsapp वर माहिती शेअर केल्यास भरावा लागेल दंड? PIB ने दिलेलं उत्तर नीट वाचा

नुकतीच अतिरिक्त कार्यभार असणारे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या दैनंदिन करोना चाचण्या आणि लसीकरण याविषयाचा आढावा घेत करोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे शहरात करोनाच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली.  चीनमध्ये ओ मायक्रॉनच्या ‘बीएफ ७’ या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असताना  भारतातही याबाबतही काळजी घेतली जात असून नवी मुंबई महापालिकेने बंद केलेली चाचणी केंद्र पुन्हा सुरु केली असून आठवडाभरात रुग्णसंख्या वाढ होत आहे. डिसेंबर २३,२४,२५,या तीन दिवस करोनाचा प्रत्येकी एक करोना रुग्ण सापडला आहे.त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असले

हेही वाचा >>> Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश

शहरात दैनंदिन ५०० हून अधिक आरटी-पीसीआर टेस्टींग व ६०० हून अधिक ॲन्टीजन टेस्टीग केल्या जात असताना या टेस्टींगमध्येही वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी  दिल्यानंतर  शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढवण्यात आलेल्या आहेत.सध्या महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणा-या एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स याठिकाणीही करोना चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. करोना रुग्ण संख्या आठवडाभरात वाढत असल्याचे दिसत आहे.सलग तीन दिवस प्रत्येकी एक रुग्णवाढ झाली आहे. परंतू पालिका या स्थितीवर लक्ष असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सातत्याने शून्य करोना रुग्ण असलेली संख्या आता वाढतेय ?

२१ डिसेंबर- १

२२ डिसेंबर- ०

२३ डिसेंबर-०

२४ डिसेंबर- १

२५ डिसेंबर-१

२६ डिसेंबर-१

२७ डिसेंबर-०

२८ डिसेंबर-०

शहरातील करोनाची आकडेवारी…..

सद्यस्थितीत उपचार सुरु असलेल्या करोनाबाधित व्यक्ति           -३

घरीच अलगीकरणात असलेल्या व्यक्ती                                                  -२

आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या                                   – २०५७

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 20:35 IST

संबंधित बातम्या