नवी मुंबई – ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – २०२५’ साठी होणाऱ्या परीक्षेसाठी ८४७७४ उमेदवारांनी अर्ज केले होते. पालिकेने या परीक्षेसाठी १६ ते १९ जुलै दरम्यान महाराष्ट्रातील १२ जिल्हयांमधील २८ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले होते.त्यात दिली. १६ ते १९ जुलै या परीक्षेच्या ४ दिवसात ८४७७४ उमेदवारांपैकी ६८१४९ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सर्व केंद्रांवरली परीक्षा प्रक्रिया व्यवस्थित रितीने पार पडली.
महापालिकेतील भरतीसाठी गट – क आणि गट – ड मधील ३० संवर्गातील ६६८ पदांकरिता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या माध्यमातून परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग १ श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘समन्वय अधिकारी ‘म्हणून तसेच २९ अधिकाऱ्यांची ‘केंद्र निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चार दिवस एका दिवशी ३ सत्रात परीक्षा घेण्यात आली.
सकाळी ९ ते ११ वा, दुपारी १ ते ३ व सायंकाळी ५ ते ७ या वेळात परीक्षा घेण्यात आली . अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेतपदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी २१५१५ उमेदवारांनी, दुस-या दिवशी १८४४२ उमेदवारांनी, तिस-या दिवशी १५०६४ उमेदवारांनी व चौथ्या दिवशी १३१२८ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. अशाप्रकारे चार दिवसात ६८१४९ उमेदवारांनी २८ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. चार दिवसांची ही संपूर्ण परीक्षा एका केंद्रावरील पर्यवेक्षकाने मदतीच्या केलेल्या प्रयत्ना व्यतिरिक्त संपूर्ण भरती प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडली आहे.भरतीविषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
भरतीसाठी परीक्षा झाली… निकालाची अधिकृत माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर मिळणार ..
नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार काटेकोरपणे होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी केली जात असल्यास उमेदवारांनी दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात आली आहे. भरतीविषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेच्या निकालाविषयी अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महानगरपालिकेचे संकेतस्थळ http://www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी. – डॉ.कैलास शिंदे ,आयुक्त ,नवी मुंबई महापालिका