नवी मुंबई : नवी मुंबईत क्षीण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. ३०० पेक्षा अधिक बचत गट आणि शेकडो महिलांची उपस्थिती यावेळी असणार आहे. या मेळाव्याद्वारे पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याची आशा पत्रकार परिषदेत उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त केली.

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडल्या नंतर काही सुमारे एक वर्षांपूर्वी शरद पवार कट्टर समर्थक अशोक गावडे यांनीही शिवसेना शिंदे गटात गेले. त्या नंतर अध्यक्ष पदाची धुरा वाहणारे नामदेव भगत यांनीही राष्ट्रवादी दुभंगल्या नंतर अजित पवार गटात उडी मारली. अनेक महिने रिक्त असलेल्या अध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली. त्या नंतर हा पहिलाच भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबरला हा मेळावा बामण देव झोटिंगदेव मैदान सेक्टर २६ नेरुळ येथे होणार आहे.

हेही वाचा : उशीर झाला तरी मोरा – मुंबई रो रो जलसेवा २०२४ ला सुरू होणार; मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात महिला बचत गट आणि महिला लघु उद्योजकांचा सत्कार, स्त्री शक्तीचा सन्मान पुरस्कार, हळदी कुंकू, असा भरगच्च कार्यक्रम असून यावेळी महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ म्हणून स्टोल्स असणार आहेत. अशी माहिती महिला अध्यक्ष सलूजा सुतार यांनी दिली. या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून  प्रमुख उपस्थिती शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड , खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष जी एस पाटील, संदीप सुतार आदि उपस्थित होते.