नवी मुंबई: रिक्षात एखादी वस्तू विसरली तर परत मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे त्यात जर विसरलेली वस्तू अत्यंत किमतीची असेल तर हि शक्यता अजूनच मावळते. असे फार कमी उदाहरणे आहेत कि ज्यात रिक्षात विसरलेली वस्तू प्रामाणिक रिक्षा चालक परत  करतो. मात्र नवी मुंबईतील नेरुळ येथे एक असा सुखद प्रकार घडला १० तोळे सोने १० तोळे चांदीचे दागिने आणि सोळा हजार रोख ठेवलेली पिशवी रिक्षात विसरली ती रिक्षाचालकाकडून कुठेतरी चुकून पडली तरीही पोलिसांच्या प्रयत्नांनी पिशवी शोधण्यात यश आले. याला केवळ नशीब म्हणत नाहीत तर पोलिसांनी ठरवले तर काहीही होऊ शकते हेच आहे.  

हेही वाचा >>> मोऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण रेल्वे स्टेशन रस्ता अखेर बंद

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

 जुईनगर सेक्टर २५  येथे राहणाऱ्या सुरेखा फुलसे  या काही दिवसापूर्वी मूळ गाव असलेले लातूर येथे गेल्या होत्या. त्या आजच सकाळी परत आल्या व एल पी बस थांब्यावर उतरल्या. आणि घरी जाण्यास रिक्षात बसल्या घर आल्यावर रिक्षातून उतरत रिक्षा चालकाला पैसे देऊन घरी जात होत्या. मात्र रिक्षात त्या पिशवी विसरल्या ज्यात १० तोळे सोने १० तोळे चांदीचे दागिने आणि सोळा हजार रोख ठेवलेली होती. मात्र तो पर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता. त्यांनी तात्काळ नेरुळ पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली.

या  घटनेबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई  गणेश आव्हाड, पुरुषोत्तम भोये व गस्त पोलीस शिपाई  लहानगे यांना माहिती देण्यात आली, त्यांनी रिक्षा क्रमांक एम एच. ४३ बी आर ७३२५ (MH 43 BR 7325) प्राप्त करून त्याचा शोध घेतला असता रिक्षा चालक बाबू प्रेमसिंग चौहान हा असल्याचे समोर आले. त्याला विचारणा केली असता त्याला काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.  त्यानंतर वर नमूद अमलदार यांनी तक्रारदार राहत असलेल्या परिसरातील येणाऱ्या मार्गातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये तक्रारदार यांची एक पिशवी  रिक्षा तून घरी जात असताना रस्त्यावर पडताना व ती बॅग तेथील एक वॉचमन घेउन जाताना दिसून आला.

हेही वाचा >>> Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी, कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोश

पोलिसांनी या  वॉचंमनचा शोध घेतला असता तो  सानपाडा परीसरात असल्याचे समोर आले. तेथे जाऊन त्याला शोधून काढले.  त्याच्याकडे चौकशी केली असता त्यास पिशवी  भेटल्याचे त्याने सांगून ती पिशवी  सादर केली. तक्रारदार यांच्या समक्ष पिशवी तपासली असता त्यात १० तोळे सोन्याचे, १० तोळे चांदीचे दागिने तसेच १६ हजार रुपये रोख रक्कम होती. तक्रारदार यांना त्याच्या वस्तु २ तासात भेटल्याने त्यांना खूप आनंद झाला असून त्यांनी पोलिसांचे कतृत्वा बाबत अभिनंदन आणि समाधान व्यक्त केले. तक्रारदार यांची बॅग ही दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक महेश पाटिल यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेली असून त्याबाबत त्यांचा जबाब नोंद करून ठाणे दैनंदिनी मध्ये नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे यांनी दिली.