नवी मुंबई: नवी मुंबईत एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पूर्ववैमनस्यातून एका महिलेने दुसरीच्या मतिमंद मुलांना अश्लील चाळे करण्यास भाग पाडले . त्याचे मोबाईल वर चित्रीकरण करून ते समाज माध्यमात प्रसारित केले आहे. हि बाब समोर आल्यावर या प्रकरणी त्या मतिमंद मुलांच्या पालकांनी संबंधित महिले विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रार अर्जाची शहानिशा करून पोलिसांनी संबंधित महिले विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी व आरोपी हे नवी मुंबईत राहत असून एकमेकांचे शेजारी आहेत. यातील फिर्यादी महिलेस एक दहा वर्षीय मुलगा तर सहा वर्षीय एक मुलगी असून दुर्दैवाने दोन्ही मतिमंद आहेत. संशयित आरोपी महिला आणि पीडित मुलांची आई यांच्यात अनेक दिवसापासून काही वाद होते. हे वाद विकोपाला गेले होते.
या वादातून संशयित महिलेने फिर्यादी यांची नजर चुकवून घरात कोणी नसताना तिच्या मतिमंद मुलाला आणि मुलीला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर तिने दोघांना अश्लील चाळे करण्यास सांगितले. त्या मतिमंद मुलांना आपण काय करतोय याचे काहीच कल्पना नव्हती तसेच कळतही नव्हते. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी महिलेने मतिमंद मुळे हे कृत्य करत असतानाचे मोबाईल वर चित्रीकरण केले. हे चित्रीकरण इंस्टाग्राम या समाज माध्यमातून व्हायरल केले. या शिवाय फिर्यादी महिले विषयी बदनामी होईल असा अश्लील भाषा वापरून मजकूर टाकला होता.
समाज माध्यमातील चित्रीकरण फिर्यादी महिलेच्या पाहण्यात ५ तारखेला (मंगळवारी) सकाळी साडे नऊच्या सुमारास आले. त्यांनी त्याच दिवशी पोलीस ठाणे गाठत संशयित महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यात सर्व नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी समाज माध्यमातील चित्रीकरण आणि फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केलेले याची शहानिशा करून संशयित महिलेच्या विरोधात बदनामी करणे.
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेस अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तांत्रिक तपास पूर्ण झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.