नवी मुंबई महापालिकेने नोटीस बजावूनही कारवाईकडे दुर्लक्ष

नवी मुंबई शहरात बेलापूरपासून ते दिघ्यापर्यंत अनेक शैक्षणिक संस्था असून सिडकोने शाळांसाठी दिलेल्या भूखंडावर विविध संस्थांच्या शाळा सुरु आहेत परंतू एकीकडे शाळांच्या मैदानावरील बेकायदा टर्फबाबत सिडकोने कारवाईचे संकेत दिले आहेत.तर दुसरीकडे  पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे शाळांमध्येही बेकायदा बांधकामे केली जात आहेत. सीवूड्स सेक्टर २५ येथील  टिळक एज्युकेशन शाळेला नवी मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकामाबाबत२४ नोव्हेंबरला नोटीस बजावली आहे.परंतू ३२ दिवसानंतर संबंधिताने स्वतः काम काढून न घेतल्यास पालिकेला कारवाई करण्याचे अदिकार असताना पालिका मात्र दोन ते अडीच महिन्यानतरही पालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अशा प्रकारामुळेच बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे अदिक फावले जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : पाण्याअभावी व्हर्टिकल गार्डन प्रयोग ठरतोय अपयशी ? दरवर्षी होतोय लाखो रुपयांचा चुराडा

सीवूड्स सेक्टर २५ येथील शाळेची इमारत असून या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाबाबत पालिकेने शाळेला नोटीस बजावली आहे. नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात  मूळ गावठाणे तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे केली जात असून त्याकडे पालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे या बेकायदा काम करणाऱ्यांचे चांगलेच फोफावते.  त्यामुळे शहरात बेलापूर ते दिघा पर्यंत सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांना पालिका अधिकारीच व त्यांचा अतिक्रमण विभागच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. सीवूड्स येथील टिळक शाळेमध्ये शालेय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसह इतर कामे करण्यात आली असून या शाळेने  इमारतीच्या टेरेसवर विनापरवानगी  अनधिकृतपणे  आरसीसी कॉलमवर स्ट्रक्चरल स्टीलच्यावर पत्राशेड बसवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्यापासून  ३२ दिवसाच्या आत हे बेकायदा बांधकाम निष्कसित करण्यात यावे अन्यथा  नियोजन प्राधिकरण  केलेले अनधिकृत बांधकाम निष्कसित करेल व त्यासाठी येणारा सर्व प्रकारचा खर्च  वसूल करण्यात येईल  असे पत्र पालिकेने शाळेला दिले आहे. परंतू अद्याप पालिकेने कारवाई केलेली नाही.त्यामुळे पालिकेची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे.पालिकेनेही टिळक शाळेला अनधिकृत बांधकामाबाबत  बेलापूर विभाग कार्यालयामार्फत  शाळेला  २४ नोव्हेबर रोजी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे शहरातील विविध  शाळांच्या इमारतीमध्ये करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांचा व सिडको व संस्थांच्यामद्ये झालेल्या करारनाम्याबाबतही अनेक प्रश्न आगामी काळात निर्माण होणार  असल्याची शक्यता निर्माण होणार आहे असे चित्र आहे. याबाबत बेलापूरच्या सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांना संपर्क केला असता संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक्रमण उपायुक्तच घालतायेत पाठीशी…?

सीवूड्स येथील टिळक एज्युकेशन संस्थेला त्यांनी शाळेच्या इमारतीत केलेल्या अनधिकृत कामाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.संबंधित संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाबाबत  नोटीस बजावण्यात आली असली तरी मी सांगीतल्याशिवाय पुढे कोणतीही कार्यवाही करायची नाही असे अतिक्रमण उपायुक्तच तोंडी आदेश देत असल्याचे चित्र असून त्यामुळे शहरात बेकायदा बांधकामाचा धडाका सुरु असून  तर दुसरीकडे कारवाईआडून मलिदा खाण्याचा प्रकार असल्याचे चित्रआहे.