नवी मुंबई: दहावी परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी अनेक ठिकाणी रिक्षा शिवाय पर्याय नसल्याने रोज किमान दिडशे पावणे दोनशे रुपयांचा भुर्दंड द्यावा लागत आहे. अशात स्थानिक शहर वाहतूक असलेल्या एनएमएमटी मात्र सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

यात अनेक ठिकाणी बस मार्ग आहेत मात्र पेपरच्या वेळेला गाड्याच नाहीत. कोपरी गाव एपीएमसी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात कोपरखैरणे, घणसोली, वाशीतील काही शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे क्रमांक आले आहेत. या मार्गावर १० क्रमांकाची घणसोली गाव ते सानपाडा स्टेशन अशी गाडी आहे. मात्र त्याचे वेळापत्रक निश्चित नाही. निदान दहावी परीक्षा काळात तरी परीक्षा वेळेत परीक्षार्थी विद्यार्थी बस सोडव्या अशी अपेक्षा दमयंती पाटील या गृहिणीने व्यक्त केली.

आणखी वाचा- पनवेल शहरातील रस्त्यावर वृक्षारोपण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिच अवस्था सक्रेड हार्ट, साई होळी फेथ कोपरखैरणे साईनाथ, फादर अँग्नेल- वाशी, नेरुळ अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या शाळांच्या आसपास बस मार्ग आहेत मात्र परीक्षा वेळात बस नाही. त्यामुळे वेळेवर पोहचण्यासाठी खाजगी रिक्षा शिवाय पर्याय नाही. म्हणजे रोज किमान दिडशे पावणे दोनशे रुपयांचा फटका बसतोच. याबाबत प्रतिक्रियेसाठी सोमवार पासून एन.एम.एम.टी व्यवस्थापकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आणखी वाचा- नवी मुंबई: जागतिक महिलादिनी उरणमध्ये महागाई विरोधी निदर्शने

एनएमएमटी आणि शिक्षण हे दोन्ही विभाग एकाच अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलेले आहेत. तरीही विद्यार्थ्यांची व पालकांची हेळसांड थांबत नाही. अशी खंत एका शिक्षकाने व्यक्त केली.