लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : शुक्रवारपासून उरणला जोडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची ३१ व ३० क्रमांकाच्या एनएमएमटीची बससेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. उरणमध्ये कोपरखैरणे ते उरण ही ३१ तर कलंबोली ते उरण या मार्गावरील ३० या दोन क्रमांकाच्या बस सुरू आहेत. या बस मधून दिवसाला ७ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. ४२ बसच्या एकूण १२० फेऱ्या या मार्गावर चालविण्यात येत होत्या या बसमुळे उरणच्या नागरिक,विद्यार्थी आणि चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्त्वाची सेवा बनली आहे. मात्र ही सेवाच आता बंद करण्याचा निर्णय एनएनएमटी व्यवस्थापनाने घेतला आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानक ते उरणच्या कोप्रोली गाव दरम्यानची या मार्गावरील एन एम एम टी ची ३४ क्रमांकाची बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. अपघाताच्या घटनेनंतर एन एम एम टी च्या कामगारांनी या मार्गावर काम करण्यास नकार दिला त्यामुळे या मार्गावर दिवसभर ५२ फेऱ्या आणि ५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्याचवेळी उरणच्या उर्वरित मार्गावरील वाहतूक ही बंद करण्याची मागणी कामगारांनी केली होती.

आणखी वाचा-‘लिडार’ कितपत प्रभावी? गावठाण, सिडको वसाहतींमधील बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारणी

उरणच्या मार्गावरील एन एम एम टी ची सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून कामगार कर्मचारी यांची सुरक्षा महत्वाची असल्याचे मत एन एम एम टी सेवेचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली आहे.