नवी मुंबई – पनवेल गोवा महामार्गाच्या रखडलेल्या मार्गासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पनवेल येथे निर्धार मोर्चा होत असून, या मेळाव्यात गोवा महामार्गावर अपघातात आपला मुलगा गमावलेल्या वृद्ध महिला वनिता कापसे यांनी आपली खंत व्यक्त केली.
हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गासाठी मंत्र्यांचा पाहणी दौरा तर मनसेचा निर्धार मेळावा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
माझा मुलगा या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दहा वर्षांपूर्वी अपघातात मरण पावला, त्यामुळे आमचे दुखणे सरकारला कसे कळणार? मी माझा मुलगा या अपघातात गमावला आहे. अनेक मातांची मुले मरण पावण्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणार का? असे दुःख वनिता कापसे या वृद्ध मातेने व्यक्त केले.