राज्यात उत्पादन वाढले असताना शेजारच्या राज्यांनीही कांदा लागवड वाढविल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. तुर्भे येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारात कांदा पाच ते आठ रुपये प्रती किलो झाला आहे. हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव पडल्याने ग्राहक खूश असले तरी शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. तोलाई, आडत दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात फार काही पडत नसल्याने सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. कांद्याला मिळणारा चांगला भाव बघून शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2016 रोजी प्रकाशित
कांदा गडगडला
राज्यात उत्पादन वाढले असताना शेजारच्या राज्यांनीही कांदा लागवड वाढविल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-04-2016 at 01:59 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices hit rock bottom across maharashtra