नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरील आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या शेजारील परिसरात जवळजवळ २०० पेक्षा अधिक झाडे तोडली आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पालिकेने झाडे तोडण्यासासाठी व तेथील जागेचे सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेले ३ जेसीबी जप्त केले असून त्यावर प्रत्येकी ३० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. परंतु अद्यापही झाडे तोडली कोणी याचा उलगडा झालेला नाही.

नवी मुंबई शहरात होऊ घातलेल्या विमानतळामुळे जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच पामबीच मार्गालगतर जागांचे भाव कोटींंची उड्डाणे घेत असल्याने या ठिकाणी सिडकोच्या मदतीने भूखंड मिळवण्यासाठीची मोठी स्पर्धा पाहायला मिळते. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी झाडे तोडण्याचा प्रकार झाला आहे, तो कांदळवनाचा बफर झोन असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. पालिका व पोलीस यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असताना सरकारी सरकारी आस्थापना काय करत होत्या असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी विचारला आहे.

मुळातच हा परिसर हा पक्षी व कोल्हा प्राण्यांसाठीचा रहिवास असलेला परिसर असून हा परिसर बफर झोन असताना येथे वृक्षतोड करण्यात आली आहे. याबाबत वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

बेलापूर सेक्टर ५२ अ परिसरातील भूखंड क्रमांक ३ ,६,७ परिसरातील झाडे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने तात्काळ जागेवरील २ जेसीबी सील केले आणि प्रत्येकी ३० हजार रुपयांचा दंड लावला. सिडकोकडून कोणाला हा भूंखंड देण्यात आला याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ.अमोल पालवे, सहाय्यक आय़ुक्त ,बेलापूर विभाग एकीकडे पामबीच मार्गालगत पालिका मुख्यालय व दुसरीकडे एनआरआय पोलीस ठाणे असताना जेसीबी लावून झाडे तोडण्याचा प्रकार घडलेला आहे. मुळातच हा परिसर कांदळवन बफर झोन असताना येथे झाडे कशी काय तोडण्यात आली. पालिका व पोलीस विभाग करतो तरी काय? सिध्द विद्या, याचिकाकर्ती