नवी मुंबई : पाणीपुरी आवडत नाही असा व्यक्ती दुर्मिळच असतो. त्यामुळे पाणीपुरी स्टॉल कुठेही टाका अगदी ठेला टाकलात तरी तिथे तुफान गर्दी होते. मात्र पाणीपुरी विकणारा किती स्वच्छता ठेवतो हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात सर्वच पाणीपुरी विक्रेते अस्वच्छ असतात असे नाही. मात्र ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारे पाणीपुरीवाले वाशी रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले आहेत. जे लोक रात्री घरी जाताना वा अतिक्रमण पथक आल्यावर पाणीपुरी सहित आपले स्टाँल थेट शौचालयात ठेवतात.

काही वर्षांपूर्वी ठाण्यातील एक पाणीपुरी विक्रेता आपल्या जवळील तांब्यात लघुशंका करतो, आणि नंतर तांब्या विसळून ग्राहकांना पाणी पिण्यास ठेवतो. असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी हा विषय राजकीय पटलावर गाजला होता. काही पक्षांनी तो परप्रांतीय आहे म्हणून विरोध केला तर काही पक्षांनी तो परप्रांतीय आहे म्हणून त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. काळासोबत विषय ही विरला.

मात्र असलाच किळसवाणा प्रकार वाशीत समोर आला असून त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक पाणीपुरी स्टॉल चक्क स्टेशन मधील सार्वजनिक शौचालय अर्थात स्वच्छतागृहांच्या मोकळ्या जागेत ठेवल्याचे दिसते. त्यात व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने शूटिंग करू देण्यास मनाई केल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. या बाबत अधिक माहिती घेतली .

हेही वाचा: नवी मुंबई : अवजड वाहतूक डोकेदुखी ठरत असल्याने पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशी स्टेशन परिसरात अनेक पाणीपुरीचे ठेले आहेत. यातील बहुतांश पाणीपुरी विक्रेते गोवंडी मानखुर्द परिसरातील असून रात्री स्वच्छता ग्रहाताच ठेला व स्टाँल ठेऊन जातात अशी माहिती समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे हे ठेवण्यासाठी स्वच्छतागृह चालवणारे पैसेही घेत असल्याची माहिती एका पाणीपुरी विक्रेत्यानेच दिली. या बाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना विचारणा केली असता तातडीने यावर कारवाई केली.