पनवेल – पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खारघरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाचा मृतदेह चुकीने दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला देण्यात आला. त्यांनी अज्ञानातून त्याचे अंतिम संस्कारही करून टाकले.

दोन्ही मृत व्यक्ती तरुण वयातील आणि मूळ नेपाळ येथील असल्याने हा गोंधळ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघांचे मृत्यू गळफासानेच झाले होते. शवविच्छेदनानंतर रुग्णालयात मृत्यू झालेल्या २५ वर्षीय तरूणाच्या नातेवाईकांनी चुकीचा मृतदेह ओळख करून ताब्यात घेतल्यामुळे पोलिस आणि रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप सुशांत यांच्या नातेवाईकांनी केले आहेत.

नियमांनुसार मृतदेहाची जबाबदारी घटनेची चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची असते, मात्र या प्रकरणात ही प्रक्रिया बिघडली. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने मृतदेह ताब्यात देताना खात्री करने गरजेचे होते.

पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीथे यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे नेपाळी असून मृत व्यक्तींची वये आणि ओळख सारखी होती. या घटनेची संपुर्ण चौकशी करण्यासाठी आम्ही त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहोत. त्यामुळे यापुढे अशी घटना घडणार नाही यासाठी नियमित प्रकीयेनूसार राबवून मृतदेह हस्तांतरण केली जाईल. या घटनेनंतर रुग्णालयात शुक्रवारी दोन्ही नातेवाईकांमध्ये समन्वयासाठी बैठक झाल्यानंतर सूशील यांचे अंत्यविधी नंतर अस्थी विसर्जनासाठी त्याच्या नातेवाईकांनी दिल्यावर हे प्रकरण शांत झाले.