नवी मुंबई – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कामार्ली येथील हेटवणे मध्यम प्रकल्पातील धरण पूर्णपणे सुरक्षित असून शनिवारी रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सांडव्या (स्पिलवे) वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत धरणाची पाण्याची पातळी ८३.३० मीटर इतकी नोंदवली गेली असून, सांडव्यावरून ०.२० मीटर खोलीने पाणी वहात आहे. सद्यस्थितीत विसर्गाचा वेग ९.४४ घन मीटर प्रति सेकंद (घमी/से) इतका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरण क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. हवामान व पर्जन्यमान लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना प्रशासन करत आहे. पेण व खालापूर तालुक्यातील काही गावांसह खारघर, उलवे यांसह पनवेल महापालिका क्षेत्रात हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो.