पनवेल : पनवेल महापालिकेच्या ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांची ऑनलाइन परीक्षा आजपासून (ता. ८) सुरू होत असून चार दिवस चालणाऱ्या परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी २१ जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांना लेखी स्वरूपात दिले आहेत.

राज्यभरात ५७ विविध केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेला ५५ हजार २१४ उमेदवार बसणार आहेत. या परीक्षेवरील नियंत्रणासाठी ५७ राजपत्रित अधिका-यांसोबत ४४१ कर्मचारी व अधिकारी परीक्षा केंद्रांवर नेमणुका पनवेल पालिकेने केल्या आहेत. परीक्षेचे नियोजन आणि केंद्रांवरील खबरदारीची माहिती गुरुवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेमधील पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन परीक्षेला सुरूवात

प्रत्येक परीक्षार्थींना डिजीटल घड्याळ, विविध वीज आणि बॅटरीसह इंटरनेटवर चालणारी उपकरणे न घेऊन जाण्याची सूचना करण्यात आली आहे. याखेरीज प्रत्येक परीक्षा खोलीत पर्यवेक्षकांसह ४ ते ८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर उमेदवारांवर असेल. २५ मीटर परिघात एकही इंटरनेट उपकरण चालू शकणार नाही यासाठी जॅमर लावल्याचे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवारांना अति तातडीची वैद्याकीय सेवा मिळावी यासाठी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी नेमले आहेत. परीक्षा केंद्रांवर वैद्याकीय सेवा पुरविणारी ही राज्यातील पहिली परीक्षा असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

हेही वाचा : टंचाईमुक्तीसाठी पाण्याची देवाणघेवाण; मोरबेचे पाणी कळंबोली, कामोठेला तर हेटवणेचे पाणी नवी मुंबईला देण्याचे नियोजन

परीक्षेसाठी खास वॉर रूम

ऑनलाइन परीक्षेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी परीक्षा वॉर रुम पालिकेत शुक्रवारी पहाटेपासून सज्ज असेल. गुरुवारी या वॉररूमची रंगीत तालीम घेण्याचे काम सुरू होते. या वॉररूममधील नियंत्रण अधिकारी राज्यभरातील केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. पारदर्शकपणा वातावरणात परिक्षा व्हावा यासाठी पालिकेने ३३ जिल्ह्यांतील उमेदवार आणि त्याच जिल्ह्यातील सरकारी लोकसेवकांना परीक्षा नियंत्रणासाठी नेमले आहे. ऐनवेळेस परीक्षार्थींचे ओळखपत्र तसेच अॅडमिट कार्डबाबत काही शंका उद्भवल्यास १५ अधिकारी पालिकेच्या नियंत्रण कक्षातून (वॉर रुम) थेट संबंधितांची अडचण दूर करणार आहेत.

हेही वाचा : उरण : जासईच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप, गव्हाण स्थानकांच्या कामाचा मार्ग मोकळा

प्रत्येक परीक्षा केंद्रावर महिला व पुरुष पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत होणाऱ्या या परीक्षेत एकही उमेदवार तोतया आढळल्यास फौजदारी गुन्हा तसेच अपंग उमेदवारांनी मदतनीसची मागणी केल्यास शैक्षणिक पात्रता तपासून मदतनीस देण्याची सोय पालिकेने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुचित प्रकार करणारे उमेदवार आढळल्यास त्यांना क्षमा केली जाणार नाही अशा सक्तीच्या सूचना आयुक्त देशमुख यांनी परीक्षा नियंत्रण करणाऱ्या सरकारी अधिकारीवर्ग आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीतील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दिवसभरात तीन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही परीक्षा होणार आहे. ५७ राजपत्रित अधिकाऱयांपैकी २१ जिल्हा केंद्र निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.