नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना शहराच्या काही भागांत जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे. सुयोग्य पाणीपुरवठ्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सिडकोबरोबर १५ एमएलडी पाण्याच्या देवाणघेवाणीतून नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आगामी काळात सिडको व नवी मुंबई महापालिका पाण्याच्या आदानप्रदानातून शहरातील काही भागातील पाण्याची ओरड थांबण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोरबेतील पाणी कळंबोली व कामोठेला तर हेटवणेचे पाणी नेरुळ एमबीआरमधून शहराला देण्याचे पालिकेचे नियोजनाचा प्रस्ताव आहे.

स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असूनही शहराच्या काही भागांत कमी अधिक पाणीपुरवठ्यामुळे पाणी समस्येला जावे लागते. मोरबे धरण यावर्षी २४ सप्टेंबरला १०० टक्के भरले व धरणातून १९.०८७ क्युबिक मीटर पाण्याचा विसर्गही करण्यात आला. धरणात पाणी परंतू पालिका क्षेत्रातील काही भागांत सातत्याने कमी-अधिक प्रमाणात पाण्याची ओरड सुरू असल्याने पालिकेने सिडकोकडून पाण्याचे देवाणघेवाण नियोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून दिवसाला जवळजवळ ५०० एमएलडी पाणी उचलले जाते. परंतू यातील काही पाणी एमआयडीसीभागाला तर काही पाणी सिडको विभागाला व इतर पाणी नवी मुंबईकरांना पुरवले जाते.

Dombivli water to Thane, Conspiracy, eknath shinde news, eknath shinde latest news,
डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…

हेही वाचा : उरण : जासईच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप, गव्हाण स्थानकांच्या कामाचा मार्ग मोकळा

पालिकेला सिडकोकडून नियमानुसार आवश्यक असलेले ८० एमएलडी पाणी मिळत नसल्याने पालिकेला बेलापूर ते दिघा या सर्वच विभागांना योग्य दाबाने पाणीपुरवठा करताना विविध भागात ओरड सुरू होते. त्यामुळे पालिकेने मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्यापैकी १५ एमएलडी पाणी कामोठे, कळंबोली या सिडको विभागाला देऊन त्याच्या मोबदल्यात सिडकोकडून हेटवणे धरणातून पालिका मुख्यालयासमोरून येणारे पाणी नेरुळ एमबीआर येथे घ्यायचे व त्या ठिकाणाहून पाणीतुटवडा जाणवत असेल त्या भागात देण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. त्यामुळे या मोरबे व हेटवणे धरणातून येणाऱ्या पाण्यातील १५ एमएलडी पाण्याची देवाणघेवाण करून पाणी समस्या दूर करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

हेही वाचा : उरण – खारकोपर रेल्वे मार्गाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचे गाजर दाखवा आंदोलन

मोरबे धरणापासून येणारे पाणी कळंबोली व कामोठेला दिल्यास हेटवणे धरणातून येणारे सिडकोचे पाणी नेरुळ एमबीआरमध्ये आणल्यास त्याचा पालिकेला उपयोग होणार असून नागरीकांना अधिक सुयोग्यरित्या पाणी देण्यात येईल असे पालिका प्रशासनाचे मत असून वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय येणार आहे. याबाबत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण मुळे यांना विचारणा केली असता याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

मोरबे धरणातील सध्याची पाणीस्थिती

२०२३— २४

धरणात पडलेला पाऊस ३७७०.४० मि.मी.

धरण पातळी ८४.४४ मीटर

धरणातील जलसाठा ८२.५० टक्के

“नवी मुंबई शहरात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मोरबे धरणाचे १५ एमएलडी पाणी सिडकोच्या कामोठे व कळंबोली नोडला देऊन त्यांच्या हेटवणे येथील धरणातून येणारे पाणी पालिकेकडे घेतल्यास नेरुळपासून ऐरोली दिघापर्यंत अधिक दाबाने पाणी देण्याचे नियोजन आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव मांडला असून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल” – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

कधीपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा : २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत