पनवेल : ग्रामीण पनवेलच्या वीज व्यवस्था अनिश्चित राहीली आहे. रविवारी काही तास विजेविना ग्रामीण पनवेलमधील गावकऱ्यांनी काढल्यावर सोमवारी पहाटेपासून गेलेली खानाव, मोरबे, आपटाफाटा, कोंडले या चारही गावातील ग्रामस्थांना विज येण्यासाठी दुपारपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी खानाव गावाजवळील विजेच्या तारा तुटल्याने त्या दुरुस्तीसाठी विज पुरवठा बंद ठेवल्याची माहिती दिली.

परंतू या परिसरात विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने वीज ग्राहक वैतागल्याची असून वारंवार विज गायब होत असल्याच्या समस्येमुळे लवकरच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार असल्याचे कोंडले गावचे ग्रामस्थ रविंद्र पाटील म्हणाले.

हेही वाचा…श्री सदस्यांचे पनवेलमध्ये निसर्ग संवर्धन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरण कंपनीच्या जिर्ण वीजतारा आणि विज वाहिन्या वेळीच न बदल्यामुळे हा विजेचा घोळ सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अखेर दुरुस्तीच्या कामानंतर सायंकाळी विज चारही गावांची परत आल्याचे महावितरण कंपनीने सांगीतले.