अडीच वर्षांच्या बालकाचा सांभाळ करंजाडे येथील एका शाळा व्यवस्थापन न करु शकल्याने संबंधित पालकाने शाळा व्यवस्थापनाविरोधात पोलीसांत तक्रार दिली आहे. दोन दिवसांपुर्वी सकाळी १० ते दुपारी सव्वा अकरा वाजता करंजाडे येथील सेक्टर ३ मधील विनायक आश्रय या इमारतीमधील पाच गाळ्यांमध्ये श्रीमती मंजुलाबेन मानेकलाल मल चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने वेद पब्लिक स्कूल ही शाळा चालविली जाते. या शाळेमध्ये अडीच वर्षांच्या बालकांना प्रवेश देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे : तळोजा एमआयडीसी रस्ता ते काटई रस्त्याचे रुंदीकरण होणार, एमएमआरडीएकडून निविदा जाहीर

बालकावर देखरेख करण्याची जबाबदारी या शाळा व्यवस्थापन आणि येथील कर्मचा-यांची असतानाही संबंधित बालक शाळेबाहेरील रस्त्यावर गेल्याने संतापलेल्या पालकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बालक एका जागरुक महिलेला सापडल्याने अनुचित प्रकार टळला. या दरम्यान बालक भितीच्या सावटाखाली आल्याने पालकांनी याबाबत पोलीसांत माहिती दिली. संबंधित बालकाचे पालक हे डॉक्टर आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी या घटनेनंतर तातडीने बाल न्याय अधिनियम २००० प्रमाणे मुलांची काळजी व संरक्षण अंतर्गत कलम २३ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. करंजाडे  नोडमध्ये इमारतींच्या गाळ्यांमध्ये शाळेचे वर्ग सूरु करण्याचा व्यवसाय जोरदार सूरु आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parent file police complaint against school management for not take care of two and a half years old child zws
First published on: 18-01-2023 at 17:41 IST