Playgrounds neglected in Navi Mumbai city | Loksatta

नवी मुंबई : खासगी शाळांची मैदाने झाली टर्फची मैदाने; तर पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित

नवी मुंबई शहरात ८ विभाग कार्यालयाअंतर्गत शहरात ७८ मैदाने आहेत. मात्र अनेक मैंदानांची दुरावस्था झाल्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्न निर्माण

Playgrounds neglected in Navi Mumbai city
नवी मुंबई शहरात खेळाची मैदाने दुर्लक्षित

नवी मुंबई शहरात सर्वसामान्यांसह तरुणांसाठी आवश्यक असणारी खेळाची मैदाने दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. एकीकडे शहरातील सिडकोमार्फत खासगी शाळांना दिलेली मैदाने खासगी शाळांनी आपल्याच ताब्यात घेतली आहेत.तर दुसरीकडे पालिकेची अनेक सर्वाजनिक मैदाने दुर्लक्षित आहेत. त्यामुळे पालिकेने खेळांच्या मैदानांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर विशेष पथकाची कारवाई

नवी मुंबई शहरात ८ विभाग कार्यालयाअंतर्गत शहरात ७८ मैदाने आहेत. पालिकेने शहरात राजीव गांधी स्टेडियम सह यशवंतराव चव्हाण क्रिडांगण अशी अनेक मैदाने खेळासाठी विकसित केली आहेत. मुले एकीकडे करोनाकाळात ऑनलाईन शिक्षणामुळे कंटाळली होती .त्यावेळी याच मैदानांवर मुलांना खेळायची संधी मिळाली होती.परंतू शहराची लोकसंख्या ही १६ लाखांच्यापुढे गेली असताना ही मैदाने मात्र पालिकेकडून दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे.अनेक मैदाने खेळासारखी नाहीत .तर अनेक मैदानावर गवत वाढलेले आहेत. त्यामुळे मुलांनी खेळायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांना आधीच खेळाअभावी स्थुलता आल्याचे करोनापासून वाढल्याचे पाहायला मिळत असताना खेळाच्या मैदानाबाबत पालिकेने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरात सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळेतच उद्याने खुली केली जात आहेत. तर नवी मुंबईत विविध खेळांना प्राधान्य आहे स्थानिक पातळीवर विविध खेळाबरोबरच क्रिकेट खेळालाही महत्व आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : देशातील पहिले स्मार्ट व्हिलेज दिवाळे गाव आता सौर ऊर्जेने उजळून निघणार

नवी मुंबईतील फोर्टी प्लसचे क्रिकेट सामने पाचगणीसारख्या शहरात नवी मुंबईकर स्थानिक खेळाडू भरवतात. नवी मुंबई शहरात असलेली खेळासाठीची अनेक मैदाने हे खाजगी शाळांच्या ताब्यात आहेत. एकीकडे नियमानुसार व सिडकोच्या करारानुसार ही मैदाने शाळेच्या वेळा व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली ठेवणे आवश्यक असताना खासगी शाळांनी मनमानीपणे सार्वजनिक मैदाने आपल्याच हक्काची असल्याच्या अविर्भावात मौदानांना कुंपन घालून ती कुलूपबंद केलेली आहेत.दुसरीकडे याच मैदानावर खासगी शाळांनी फुटब़ॉल टर्फ बनवून त्याचा व्यावसायिक वापर सुरु केला आहे.त्यामुळे या खासगी शाळांच्या मैदानांवरील अतिक्रमणाला व मनमानी विरोधात मनसेने आवाज उठवल्याने सिडकोने शहरातील अनेक खासगी मैदानांना टर्फ हटवण्याच्या व मैदाने शाळेच्या वेळा व्यतिरिक्त खुली करण्याचे लेखी आदेश दिलेले आहेत.अन्यथा सिडको या खासगी शाळांभोवतालचा करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

एकीकडे सिडकोला अनेक वर्षानंतर खासगी शाळांच्या मैदानाबाबत योग्य भुमिका घेतलेली असताना दुसरीकडे पालिकेनेही शहरात खेळासाठी असलेली मैदाने सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे.शहरात बेलापूर ते दिघा येथील अनेक खेळाची मैदाने दुर्लक्षित असून मैदानावर कचरा तर गवतही वाढलेले पाहायला मिळते. पालिकेने शहरातील मैदानांची देेखभाल दुररुस्ती करणे आवश्यक आहे. पुनर्विकासाला सुरवात झाली असताना खेळासाठी आवश्यक असलेल्या मैदाने सुव्यवस्थित ठेऊन ती सर्वसामान्य मुलांना खेळासाठी आवश्यक सोयीसुविधा देण्याची आवश्यक आहेत. शहरातील अनेक खेळाच्या मैदानांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले.अनेक खेळाची मैदाने पार्किंगची ठिकाणे तर अनेक मैदानावर वाढलेले गवत पाहायला मिळते.

हेही वाचा- येत्या मंगळवारपासून नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

नवी मुंबई शहरात खासगी मैदाने शाळांनी ताब्यात घेतली आहेत. ती खुली झालीच पाहीजेत त्याचबरोबरच पालिकेची शहरातील सर्व खेळाची मैदाने सुस्थिlतीत असली पाहीजेत. पालिका या मैदानांकडे दुर्लक्ष करते.अनेक मैदानांवर गवत साचलेले असते. स्थानिक मुलेच स्वतः मैदाने स्वच्छ करुन घेतात. पालिकेने सार्वजनिक मैदानांकडेही योग्य लक्ष देण्याची गरज आहे.खेळापेक्षा इतर कार्यक्रमासाठीच मैदानांचा जास्त वापर होतो हे चुकीचे आहे, अशी माहिती एकता कला ,क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी दिली.

हेही वाचा- बंदी असतानाही पान टपरीवर सर्रास गुटखा विकणारा पकडला; लाखोंचा गुटखा जप्त

नवी मुंबई शहरातील पालिकेच्या खेळांच्या मैदानाबाबत पालिका आयुक्तांशी नुकतीच अर्थसंकल्पाबाबत चर्चा झाली आहेत. या मैदानाबाबत एक धोरणात्मक निर्णय घेण्याचे आयुक्तांनी सांगीतले असून मैदानांचा खेळांच्यासाठी योग्य तो बदल करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त ,क्रीडा नवी मुंबई महापालिकेच्या क्रिडा विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:33 IST
Next Story
एपीएमसीत हापूसची आवक वाढली; दर मात्र स्थिर, देवगड आणि रायगडच्या १२५ पेट्या बाजारात दाखल