वाशी रेल्वे पोलिसांनी मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून जेरबंद केले आहे. यातील तीन पैकी दोन आरोपींना अटक केली असून एक फरार झाला आहे. आरोपी कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  राजू राजेश्वर सोनी आणि   अनिकेत गुलाब सिरसाठ असे अटक आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद जमाल मिनू शेख हे कुर्ला ते वाशी प्रवास करीत होते. त्यावेळी मानखुर्द रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या प्रवाशांपैकी तीन प्रवाशांनी गाडी पुन्हा मार्गस्त होत असताना मोहम्मद यांच्या हातातील मोबाईल आणि खिशातील पैशांचे पाकीट बळजबरीने घेतले. वाशी रेल्वे स्टेशन आले असता चोरटे उडी टाकून पळून जाण्याच्या बेतात होते, मात्र प्रवाशांनी चोर असल्याचं म्हणत आरडा ओरडा केल्याने स्टेशनवरील बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींकडून ४ हजार ४०० रुपये जप्त केले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली. तर, तिसऱ्याया आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.