मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक सह इतर बाजार समितीमधील संचालक मंडळाचे ७ संचालकांचा त्यांच्या स्थानिक एपीएमसी मधील कार्यकाळ संपल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संचालक पदे ही रद्द करण्यात आली होती. मात्र पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सूनावणी होईपर्यंत या आदेशाला स्थगिती दिली होती . पणन मंत्री एकनाथ शिंदे यांनी संचालक यांना अपात्र ठरवल्यास सभापती अशोक यांना सभापतीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार समितीत पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता असून या ठिकाणी शिंदे गटाचे कट्टर समर्थक प्रभू पाटील यांची वर्णी लागण्याची चर्चा बाजार वर्तुळात तसेच सर्वत्र सुरू आहे.

हेही वाचा- उरणमध्ये गोवरचा संशयित रुग्ण

बाजार समितीत सहा महसुल विभागातून प्रत्येकी २ असे १२ शेतकरी प्रतिनिधी संचालक निवडून आले होते. त्यापैकी ७ जणांची त्यांच्या स्थानिक बाजार समितीत मुदत संपली. त्यामुळे एपीएमसी नियमांनुसार त्या बाजार समितीत त्यांची मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी पद रद्द झाले असेल तर एपीएमसी मध्ये ही संचालक पदासाठी अपात्र ठरतात. त्यानुसार हे संचालक अपात्र ठरले होते. परंतु या संचालकांनी न्यायालयामध्ये धाव घेऊन मुदतवाढ मिळवली आहे. त्यापैकी सभापती अशोक यांना १४ डिसेंबर पर्यंत न्यायालयाने मुदतवाढ दिलेली आहे. त्याच दरम्यान पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्रतेच्या आदेशाला सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली होती. याबाबत पणनमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार होती.

हेही वाचा- जेएनपीटी लाँच सेवा गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यावरून; ‘नेव्ही डे’साठी चार दिवस गेटवे धक्का बंद

ऑक्टोबर महिन्यात ठरलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज शुक्रवारी २ डिसेंबर रोजी घेण्यात येणार होती. तीही पुढे ढकल्याची माहिती सभापती अशोक डक यांनी दिली आहे. मात्र याच दरम्यान गुरुवारी सह्याद्री गृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये एपीएमसी सभापती अशोक डक यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी एपीएमसी बाजार समितीत संचालक मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आता राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आली असून एपीएमसीमध्येही शिंदे गट आपली सत्ता स्थापन करणार का? अशी चर्चा बाजार वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या सभापती पदी बदलापूरचे संचालक प्रभू पाटील यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे . त्यामुळे आगामी कालावधीत बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त होऊन नव्याने निवडणुका होतील का? राज्या प्रमाणेच बाजार समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गट यशस्वी होईल का? याची उत्सुकता लागलेली आहे.