वाशी एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. बाजारात नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात झाली. ३ गाड्या दाखल झाल्या असून, आवक वाढल्याने लसणाचे दर उतरले आहेत. घाऊक बाजारात दरात १० रुपयांनी घसरण झाली आहे. प्रतिकिलो २० ते ११० रुपयांनी विक्री होणारे लसूण आता २० ते १०० रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन ओला लसूण दाखल होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे, नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात. फेब्रुवारीअखेर नवीन लसूण मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होणार असून, दर आणखी कमी होतील, असे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे. मागील महिन्यात नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे, जुन्या लसणाला मागणी अधिक वाढली होती. परिणामी दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. परंतु, बाजारात आता नवीन लसणाची आवक वाढत असून, दरात घसरण होत आहे. त्यामुळे नवीन लसणाने जुन्याचे दरही गडगडले आहेत.

हेही वाचा – ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प महिनाअखेरीस होण्याची चिन्हे; अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात 

हेही वाचा – त्या वणवा प्रतिबंध तंत्राला वनश्री पुरस्कार; सगुणा वनसंवर्धन तंत्राचा गौरव, पालकमत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारात गुरुवारी लसणाच्या १३ गाड्या दाखल झाल्या असून, जुना लसूण ९० ते १०० रुपये, तर नवीन लसूण ६५ ते ८० रुपयांवर विक्री होत आहे. फेब्रुवारी अखेर बाजारात नवीन लसणाची आवक वाढणार असून, दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील कालावधीत गृहिणींना दिलासा मिळणार आहे.