rain lashes navi mumbai rain in navi mumbai after navratri festival zws 70 | Loksatta

नवी मुंबईत पावसाने नवरात्रीत घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा पावसाला सुरवात ; बेलापूरमध्ये सर्वाधिक पाऊस

शहरात सायन पनवेल महामार्गासह शिळ फाटा, ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

नवी मुंबईत पावसाने नवरात्रीत घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा पावसाला सुरवात ; बेलापूरमध्ये सर्वाधिक पाऊस
मुंबई-ठाण्याला झोडपले

नवी मुंबई -नवी मुंबई शहरात नवरात्रीच्या आठ दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी शहरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या शहरात विविध उपनगरात पाऊस पडला असून बेलापूर विभागात सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद कोपरखैरणे विभागात झाली. सकाळ पासूनच अवकाशात  काळे ढग पसरले होते.

नवी मुंबईत सर्व विभागात दिवसभर काळोख पाहायला मिळाला. शहरात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती.शहरात सायन पनवेल महामार्गासह शिळ फाटा, ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  तर सायन पनवेल महामार्गावरही वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. शहरात दिवसभर नेरुळ ,बेलापूर भागात चांगला पाऊस झाला तर इतर विभागात तुरळक पाऊस झाल्याची मा  माहिती पालिका आप्तकालिन विभागाने दिली .

शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंतचा पाऊस

बेलापूर- २९.८

नेरुळ- १५.४

वाशी- ३.६

कोपरखैरणे- ०.२

ऐरोली- ३.६

दिघा- २.०

सरासरी पाऊस- ९.१०मिमी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नेरुळ एनआरआयमागील मिस्त्री कंन्स्ट्रक्शनचे बेकायदा बांधकाम तात्काळ थांबवा ; पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरीकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

संबंधित बातम्या

पनवेल: लक्ष्मीपूजनाला ठेवलेले सात लाखांचे सोने चोरीला; गुन्हा दाखल
नवी मुंबई: घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता
‘त्या’ कर्तव्यदक्ष पोलीसाच्या अवयवदानामुळे मिळाले दोघांना जीवदान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
तीन लग्नं, घटस्फोट अन्… वैवाहिक आयुष्यातील अपयशानंतर अशी झालेली शाहिदच्या आईची अवस्था
शिंदे- फडणवीस सरकारला मोठा धक्का, महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामे रद्दच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
IND vs BAN: न्यूझीलंडहून परतणारे टीम इंडियाचे खेळाडू खराब व्यवस्थेचे बळी; दीपक चहरने केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण
‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका
‘खात्यात पैसे का नाहीत?‘ म्हणत बाईने घातला बॅंकेत राडा; दगडाने फोडल्या ATM च्या काचा अन्…