शिक्षक व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती

नवी मुंबई -दरवर्षी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक ते दहावीपर्यंतचा निकाल १ मे महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात येतो. परंतु यावर्षी महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय संचालक कृष्णकुमार पाटील यांनी २८ एप्रिल रोजी काढलेल्या पत्रकाप्रमाणे राज्यभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा निकाल १ मे या महाराष्ट्र दिना ऐवजी ६ मे  रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : योग विवेकबुद्धीला जागृत करतो, योग विद्या निकेतनचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत यांचे प्रतिपादन

Chillar Party, Chillar Party Celebration Twelfth Anniversary, Special Children Film Screening , Chillar Party with Special Children Film Screening, Special Children Film Screening in Kolhapur, Kolhapur news, children special film Kolhapur, Kolhapur news, Chillar Party news, marathi news,
चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

त्यामुळे पालिका क्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल १ मे ऐवजी ६  मे रोजी मिळणार आहे. त्यादिवशी राजश्री शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करून शाळांचा निकाल जाहीर केला जाणार आहे व विद्यार्थ्यांना व पालकांना त्याच दिवशी गुणपत्रकाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. १ मे रोजी शाळांना सुट्टी लागल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ६ मे रोजी शाळेत यायचे का याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पालिका क्षेत्रातील बहुतांश खाजगी शाळांचे निकाल १ मे पूर्वीच जाहीर करून मुलांना वाटप करण्यात आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख, आता ३ मे चा मुहूर्त?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी २८ एप्रिल रोजी काढलेल्या पत्रकाबाबतची माहिती महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना व  शिक्षकांना देण्यात आली आहे .त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा निकाल हा १ मे ऐवजी ६ मे रोजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अरुणा यादव, शिक्षणाधिकारी नवी मुंबई महापालिका