पनवेल : पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाल, स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलीसांना वेळोवेळी पत्र व्यवहार करुन सुद्धा पनवेल रेल्वे स्थानकासमोरील रिक्षाचालकांची मुजोरी निकालात काढली जात नाही. सरकारी प्रशासनातील अधिका-यांना रिक्षाचालकांवर कार्यवाही करण्यात रस नसल्याने ही स्थिती ओढावली आहे. पनवेल स्थानकात येजा करणा-या प्रवाशांनी चालावे कसे असा प्रश्न या स्थानकात प्रवेश करणा-या रस्त्यावरुन चालताना पडतो. बेकायदा रिक्षाथांबे आणि नो एन्ट्रीच्या रस्त्यावरुन वाहतूक सूरु असल्याने सामान्यांना चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरली नाही.

हेही वाचा >>> उरण मध्ये समाधानकारक पाऊस; भात पिकांच्या उत्पादनात होणार वाढ

पनवेल रेल्वेस्थानकातून प्रवास करणा-या प्रत्येकाला तीन आसनी रिक्षाचालकांच्या दंडेलशाहीचा सामना करावा लागतो. 60 फूटी रस्ता रेल्वेस्थानकातून येजा कऱण्यासाठी आहे. मात्र सामान्य प्रवाशांना चालण्यासाठी अवघी सहा फुट रुंदीच्या पदपथावरुन एकमेकांना धक्केमारुन रस्त्यावरुन चालावे लागते. यातील निम्मा रस्ता तीन आसनी रिक्षाचालकांनी व्यापला आहे. तसेच उरलेल्या निम्या रस्त्यामध्ये एकरी मार्ग असताना त्यावरुनही दुहेरी प्रवास रिक्षाचालक करतात. हे सर्व रेल्वे प्रशासनातील अधिका-यांच्या डोळ्यादेखत होते. मात्र रेल्वे स्थानक मास्तरांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला कळवून सुद्धा तीन आसनी रिक्षाचालकांना शिस्त लावली जात नाही. सध्या एक्सप्रेस गाड्या पकडण्यासाठी आणि एक्सप्रेस गाड्यातून उतरणा-या प्रवाशांनी स्थानकाबाहेरील एकेरी रस्त्यावर रिक्षा थांबा नव्याने केला आहे. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची या स्थानक परिसरात सातत्याने कार्यवाही झाल्यास हा प्रश्न निकाली निघेल. याबाबत पनवेल विभागाचे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. सामान्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवा येथे सूरु आहे. मात्र ही बससेवा स्थानकाबाहेरुन असल्याने प्रवाशांना पायी चालून बसथांबा गाठावा लागतो. मीटर प्रमाणे भाडे न आकारणा-या तीन आसनी रिक्षाचालकांवर कठोर कार्यवाही केली जावी यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी येथे सकाळपासून रात्रीपर्यंत नेमावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.  

हेही वाचा >>> अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पथकावरच फेरीवाल्यांची दादागिरी

यापूर्वी दररोज सायंकाळी कार्यवाही केली जात होती. सणउत्सवाच्या काळात ही कार्यवाही काही वेळ थांबली होती. मात्र तीन आसनी रिक्षाचालकांसोबत प्रवाशांना शिस्त लावण्याची गरज आहे. प्रवाशांनी रांगेत येऊन रिक्षा पकडल्यास रिक्षाचालकांना शिस्त लागेल. काही प्रामाणिक रिक्षाचालक रांगेत थांबतात परंतू रांगेत घुसखोरी करणा-यांमुळे हा सर्व प्रकार घडत आहे. यामुळे रांगेत प्रामाणिक प्रवाशांची वाट पाहणा-यांचे नूकसान होते. उद्यापासून ही कारवाई सूरु होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाहतूक विभाग