scorecardresearch

आरटीओची सात दिवसांत २२२ वाहनांवर कारवाई; नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करडी नजर

सात दिवसात रिक्षा, ट्रक ,बस, शाळा बस , इत्यादी वाहने अशा ४८५ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

आरटीओची सात दिवसांत २२२ वाहनांवर कारवाई; नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करडी नजर
आरटीओची सात दिवसांत २२२ वाहनांवर कारवाई

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनाकडून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. ७ दिवसांत वाशी आरटीओने ४८५ वाहनांची तपासणी करून केली त्यापैकी २२२ वाहन ही विदाऊट फिटनेस म्हणजेच योग्यता प्रमाण नसलेली आढळली आहेत. अशा २२२ वाहनांवर आरटीओने कारवाई करून ६६ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तर १ वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द केले आहे.

हेही वाचा- अरेरे! आशियातील सर्वात मोठी एमआयडीसी आणि रस्त्यांची ही अवस्था ? ना रस्ते, ना पथदिवे, ना फुटपाथ

नवी मुंबई शहरातही दिवसेंदिवस वाहन संख्या वाढत आहे. यामध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या अधिक वाढत आहे . मात्र आजही शहरात काही वाहने फिटनेस, इन्शुरन्स,व पियुसी नसताना नियमबाह्यपणे चालविली जात आहेत. मागील आठवड्यात अवैधपणे वाहतूक ककरणाऱ्या शालेय बस आरटीओच्या रडारावर होते. त्याचप्रमाणे आरटीओने आता नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे मोर्चा वळविला आहे. दिनांक २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर पर्यंत या सात दिवसात रिक्षा, ट्रक ,बस, शाळा बस , इत्यादी वाहने अशा ४८५ वाहनांची तपासणी केली. यापैकी २२२ वाहनांची फिटनेस म्हणजेच योग्यता नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ६६ हजार दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. तर एका वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे . आरटीओ अधिकारी हेमांगी पाटील यांच्या कार्यकाळात या नियमबाह्य अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईचा बडगा वाढला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-10-2022 at 11:01 IST

संबंधित बातम्या